• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. china new corona virus health tips super food that can help you to fight against new covid variant bf 7 pvp

Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश

New Covid Variant BF.7: या आजारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.

Updated: December 29, 2022 09:20 IST
Follow Us
  • covid precaution superfoods
    1/12

    चीनमधील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेसुद्धा खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अडीच ते तीन वर्ष संपूर्ण जगात करोनाने थैमान घातलं आहे. यांचा जोरदार फटका भारताला बसला.

  • 2/12

    याच अनुषंगाने पुन्हा डोकं वर काढणाऱ्या या विषाणूला वेळीच आळा घालण्यासाठी भारत तयारी करत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. करोनाचे नवे BF.7 व्हेरिएंट अतिशय धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. याच्याशी लढा देण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे.

  • 3/12

    हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळेच आपण अगदी सहज कोणत्याही आजाराला बळी पडू शकतो. म्हणूनच या आजारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

  • 4/12

    मेडिकल न्यूज टूडेनुसार, अनेक औषधी गुणांनी समृद्ध असलेली हळद आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामधील अँटीबॅक्टेरियल गुण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

  • 5/12

    याशिवाय हिवाळ्यात हळदीचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप इत्यादी समस्यांपासून आराम मिळू शकतो. करोना विषणूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी दररोज हळद घातलेले गरम दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.

  • 6/12

    हेल्थ लाइन वेबसाइटनुसार, हिवाळ्यात ताज्या हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या ऋतूमध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामध्ये पालक ही अशी भाजी आहे जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी आहे.

  • 7/12

    पालकमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, पण त्याचबरोबर ते आपल्या डोळ्यांसाठीही अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडेंट्स आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.

  • 8/12

    हेल्थ लाइन वेबसाइटनुसार, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी अतिशय लाभदायक आहेत. यामध्ये व्हिटॅमिन, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

  • 9/12

    नियमित अंडी खाल्ल्याने केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नही, तर यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते. त्यामुळेच आपल्या आहारात अंड्यांचा समावेश केल्याने आपल्याला करोना विषणूपासून स्वतःचा बचाव करण्यास मदत मिळू शकते.

  • 10/12

    मिठाईमध्ये वापरण्यात येणारा सुका मेवाही करोना विषणूपासून आपले रक्षण करण्यास मदत करू शकतो. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंट्स यासारखे घटक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. यांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते.

  • 11/12

    हेल्थ लाइन वेबसाइटनुसार, व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असलेली आंबट फळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त आहेत. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला संसर्गापासून लढा देण्यासाठी मदत करते. त्यामुळे करोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहारात संत्री, आवळे, मोसंबी, लिंबू, किवी, पेरू अशा फळांचा समावेश करावा.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirusकोव्हिड १९Covid 19चीन करोनाChina Coronaहेल्थHealthहेल्दी फूडHealthy Food

Web Title: China new corona virus health tips super food that can help you to fight against new covid variant bf 7 pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.