• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips this oil in food can be toxic for diabetic patients know which cooking oil is best pvp

Health Tips: मधुमेही रुग्णांसाठी जेवणातील ‘हे’ तेल ठरू शकते विषासमान; जाणून घ्या, कोणते कुकिंग ऑइल आहे सर्वोत्तम

मधुमेहाच्या रूग्णांवर केलेल्या विस्तृत संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की प्रामुख्याने तीन प्रकारचे तेल मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत.

Updated: January 2, 2023 15:51 IST
Follow Us
  • Best Cooking Oil for Diabetes Patients
    1/12

    मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्यात सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणा रक्तातील साखर वाढवू शकतो आणि त्याचा परिणाम घातक ठरू शकतो.

  • 2/12

    तज्ज्ञांच्या मते, या रुग्णांनी, ते कोणते तेल आणि कोणत्या प्रमाणात खात आहेत हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • 3/12

    सॅच्युरेटेड फॅटच्या श्रेणीत येणारे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. त्याचा हृदयावरही वाईट परिणाम होतो.

  • 4/12

    आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सॅच्युरेटेड फॅट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढवते. याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) असेही म्हणतात. यामुळे रक्तातील साखरेव्यतिरिक्त हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

  • 5/12

    डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष आणि देशातील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. व्ही मोहन म्हणतात की पाम तेल आणि खोबरेल तेल यांसारखे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आढळते.

  • 6/12

    याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या आहारातील चरबीचे प्रमाण ३०% पेक्षा कमी असावे. चरबीमुळे साखरेची तात्काळ वाढ होत नसली तरीही ती शरीराचे दीर्घकाळात नुकसान करते.

  • 7/12

    डॉ. व्ही मोहन म्हणतात की, मधुमेहाच्या रूग्णांवर केलेल्या विस्तृत संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की प्रामुख्याने तीन प्रकारचे तेल मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत. ते तेल मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड श्रेणीमध्ये मोडते.

  • 8/12

    मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर तेल

  • 9/12

    शेंगदाण्याचे तेल

  • 10/12

    मोहरीचे तेल

  • 11/12

    तिळाचे तेल

  • 12/12

    डॉ. मोहन यांच्या म्हणण्यानुसार मधुमेहाचे रूग्ण आपल्या आहारात राईस ब्रॅन ऑइल, सूर्यफुलाचे तेल किंवा मक्याच्या तेलाचा समावेश करू शकतात. हे तेल पॉली अन-सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड श्रेणीमध्ये मोडतात.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Health tips this oil in food can be toxic for diabetic patients know which cooking oil is best pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.