-
प्यूरीन पदार्थांचे अधिक सेवन केल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होतात, यालाच युरीक अॅसिड म्हणतात. शरीरात तयार होणारे हे विषारी घटक शरीरातून बाहेर पडले नाहीत तर ते शरीरासाठी अतिशय हानिकारक सिद्ध होऊ शकते.
-
शरीरात युरीक अॅसिडची पातळी वाढल्यास संधिरोगाचा त्रास होण्याची शक्यताही वाढू शकते. युरीक अॅसिड वाढल्याने गुडघ्यांना आणि पायाच्या बोटांना वेदना होण्याचे प्रमाण वाढीस लागते.
-
दैनंदिन आहारात प्रोटीनचे अधिक सेवन केल्यास युरीक अॅसिडची पातळी वेगाने वाढू लागते.
-
युरीक हे शरीरात स्वतःहून तयार होणारे एक आवश्यक एमिनो अॅसिड आहे. काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात युरीक अॅसिडची मात्रा वाढू लागते.
-
जे लोक संधिरोग, सांधेदुखी आणि हायपरयूरीसेमिया या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी आपल्या दैनंदिन आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
-
ज्या लोकांना युरीक अॅसिडची समस्या आहे त्यांनी रात्रीच्या आहारात डाळ-भात खाणे टाळावे.
-
डाळ-भात खाल्ल्याने युरीक अॅसिड वेगाने वाढू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर शारदा यांनी डाळ-भात खाल्ल्याने युरीक अॅसिड कसा वाढू शकतो आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
-
ज्या लोकांच्या शरीरातील युरीक अॅसिडने उच्च पातळी गाठली आहे त्यांनी रात्री डाळ-भाताचे सेवन करू नये. कारण हा आहार शरीरातील युरीक अॅसिडची पातळी वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
-
प्रथिनांनी समृद्ध असलेली डाळ बोट आणि सांध्यामधील वेदना वाढू शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस सालीच्या डाळीचे सेवन करणे टाळावे.
-
कुकरमध्ये डाळ बनवताना तयार झालेला फेस निघून जात नाही. हा फेस एक प्रकारचे सर्फक्टंट आहेत आणि हे शरीरासाठी मंद विषासारखे कार्य करतात. जे शरीरात जाऊन यूरिक अॅसिड खूप वेगाने वाढवतात.
-
ज्या लोकांना यूरिक अॅसिडची समस्या असते त्यांनी रात्रीच्या वेळेस डाळ-भाताचे सेवन केल्यास संधिरोगाची समस्या वाढू शकते.
-
ज्या लोकांना यूरिक अॅसिडची समस्या आहे त्यांनी नियमितपणे गरम पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडची समस्या कमी होऊ शकते.
-
१० ते १५ मिली पाण्यामध्ये आवळा टाकून त्याचे सेवन केल्याने एक ते दोन महीने जुन्या यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवता येते.
-
ज्या लोकांना यूरिक अॅसिड आहे त्यांना आठवड्यातून एक दिवस उपवास करावा. उपवास केल्याने यूरिक अॅसिडचे स्फटिक बारीक होऊन शरीराबाहेर पडतात.
-
यूरिक अॅसिड वाढल्याने होणाऱ्या वेदानेपासून आराम मिळण्यासाठी वेदनाशामक तेलाने मालिश केल्यास फायदा होऊ शकतो. (Freepik)
Uric Acid: रात्रीच्या जेवणात डाळ-भात खाल्ल्याने वाढते युरीक अॅसिडची समस्या? तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय एकदा पाहाच
शरीरात तयार होणारे युरीक अॅसिड शरीरातून बाहेर पडले नाहीत तर ते शरीरासाठी अतिशय हानिकारक सिद्ध होऊ शकते.
Web Title: Eating dal rice in dinner increases the problem of uric acid check out the solutions given by the experts pvp