-
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू लागला आहे. मात्र हे आजार का वाढत आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
-
जागतिक आरोग्य संघटना (WHO)नुसार दर आठवड्यात १५० मिनिटांसाठी शारीरिक व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आजारी पडत नाही. मात्र भारतातील बहुसंख्य लोक शारीरिक हालचालींवर नीट लक्ष देत नसल्याने ते जास्त आजारी पडतात.
-
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्समधील एमहर्स्ट डिपार्टमेंट ऑफ किनेसियोलॉजी येथील डॉक्टरेटच्या विद्यार्थिनी शिवांगी बाजपेयी सांगतात की भारतीयांना जर आजारपासून दूर राहायचे असेल तर त्यांनी आपल्या शारीरिक हालचाली वाढवणे गरजेचे आहे.
-
युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्समधील प्राध्यापक डॉ. अमांडा पालुच यांनी नुकतेच एक अध्ययन शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी हृदयविकाराने ग्रस्त लोकांना चालण्याचा सल्ला दिला आहे.
-
या अध्यायनानुसार, दररोज काही अंतर चालल्याने हृदयविकाराचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. आज आपण तज्ञांच्या हवाल्याने जाणून घेऊया की दररोज किती पावले चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
-
या अध्यायनातून असा निष्कर्ष काढण्यात आला एकी प्रतिदिन दोन हजार पावले चालणाऱ्या लोकांच्या तुलनेत प्रतिदिन सहा ते नऊ हजार पावले चालणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, इत्यादीचा धोका ४०-५० टक्क्यांनी कमी होता.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शारीरिक हालचाली कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका यासह इतर अनेक गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
-
संशोधकांच्या म्हणण्यानुसार भारतीय महिला घरातील काममध्ये व्यग्र असतात आणि त्यांची अशी धारणा असते की त्या शारीरिक हालचाली करत आहेत. तथापि, हे काही अंशी योग्य असले तरीही महिलांनीही दररोज सहा ते नऊ हजार पाऊले चालणे गरजेचे आहे.
-
दररोज चालण्याचे इतरही कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
-
दररोज चालल्याने आपली रोगप्रतिकरक शक्ती मजबूत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.
-
संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज चालणे आवश्यक आहे.
-
दररोज चालल्याने नैराश्यापासून मधुमेहापर्यंत अनेक गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करणे शक्य होते.
-
नियमित चालल्याने वजन नियंत्रणात राहते.
-
हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकारांपासून संरक्षण करण्यास मदत होते. (Photos: Freepik)
Health Tips: दररोज चालल्याने कमी होईल Heart Attackचा धोका; जाणून घ्या, रोज किती पावले चालणे गरजेचे
Web Title: Health tips walking every day will reduce the risk of heart attack know how many steps you need to walk every day pvp