-
अल्झायमर हा एक मानसिक आजार आहे जो वृद्धापकाळात जास्त प्रमाणात आढळतो. मात्र, सध्याची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक कमी वयातच या आजारासारख्या अनेक मानसिक समस्यांना बळी पडत आहेत.
-
लवकर निदान झाल्यास अल्झायमरची लक्षणे बर्याच प्रमाणात आटोक्यात ठेवता येतात. या आजाराबाबत लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
वृद्ध लोकांना स्मृतिभ्रंश होण्याचा सर्वाधिक धोका असतो. ६५ वर्षांवरील सुमारे ५% ते ८% लोक डिमेंशियाच्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ग्रस्त असून दर पाच वर्षांनी ही संख्या दुप्पट होते.
-
यासोबतच धूम्रपान, हृदयविकार, मेंदूला झालेली इजा, कौटुंबिक इतिहास, मधुमेह, डाऊन सिंड्रोम, स्लीप अॅप्निया, खराब जीवनशैली ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत.
-
हेल्थ लाईननुसार असे काही पदार्थ आहेत जे मेंदूला निरोगी ठेवतात. मानसिक आरोग्य चांगले असेल तर अल्झायमरसारखे आजार वेळीच टाळता येतात. पाहुयात, असे कोणकोणते पदार्थ आहेत जे मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत.
-
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अल्झायमर, सिनाइल डिमेंशिया यांसारख्या आजारांपासूनही बचाव होतो. पालक, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, कोबी यांचा आहारात समावेश जरूर करावा.
-
अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश असलेले लोक देखील मासे खाऊ शकतात. मासे दुबळे प्रथिने आणि निरोगी चरबी प्रदान करतात. तुम्ही सॅल्मन, सार्डिन, कॉड, ट्यूना फिश खाऊ शकता.
-
बीन्समध्ये प्रोटीन, फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे अल्झायमर टाळण्यासाठी फायदेशीर असतात. त्यात फोलेटचे प्रमाणही चांगले असते. जे खाल्ल्याने म्हातारपणात अल्झायमरचा धोका कमी होतो.
-
साखरेशिवाय ग्रीन टी प्यायल्याने सौम्य संज्ञानात्मक कमजोरी, स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. ग्रीन टी प्यायल्याने मेंदूचे आरोग्य सुधारू शकते.
-
जांभूळ खाल्ल्याने स्मृतिभ्रंश, अल्झायमरचा धोका कमी होतो. त्यात फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी कंपाऊंड्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे असतात. रोज एक ग्लास ब्ल्यूबेरी ज्यूस प्यायल्याने स्मरणशक्ती सुधारते. (Pixabay)
-
सुख्यामेव्याचे दररोज सेवन केल्यानेदेखील मेंदूचे आरोग्य सुधारते. म्हातारपणात अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या आहारात वेगवेगळ्या ड्रायफ्रूटसचा नियमित समावेश करा.
-
Photos: Freepik
वेळीच रोखता येईल ‘अल्झायमर’ आणि स्मृतिभ्रंशाचा धोका; मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी आजच ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश
धूम्रपान, हृदयविकार, मेंदूला झालेली इजा, कौटुंबिक इतिहास, मधुमेह, डाऊन सिंड्रोम, स्लीप अॅप्निया, खराब जीवनशैली ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत.
Web Title: Prevent alzheimer and dementia in time include these foods in your diet today for healthy brain health pvp