• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world heart day 2023 heart attack risk going up in young women at early age due unhealthy habits ndj

World Heart Day 2023 : महिलांमध्ये वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका; ‘या’ गोष्टी आहेत कारणीभूत

World Heart Day 2023 : हार्ट अटॅक हा नेहमी पुरुषांसाठी चिंतेचा विषय मानला जातो; पण महिलांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्यामुळे महिलांनीही हार्ट अटॅकच्या लक्षणांपासून सावध राहणे तितकेच गरजेचे आहे. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Updated: September 28, 2023 10:00 IST
Follow Us
  • World Heart Day 2023
    1/9

    सध्या पुरुषांसह स्त्रियांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. त्यातवयोवृद्ध व्यक्तींपेक्षा कमी वयात म्हणजे तरुणांमध्ये विशेषत: तरुणींमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    काही संशोधकांनी चार शहरांमध्ये हार्ट अटॅकशी संबंधित तेथील २८,००० हून अधिक रुग्णांचा अभ्यास केला तेव्हा वृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण कमी असून, ३५ ते ५४ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. (Photo : Freepik)

  • 3/9

    याविषयी नवी दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट – ओखला येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. निशिथ चंद्रा सांगतात, “मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन सक्रिय असतो. त्यामुळे महिलांना हार्ट अटॅकचा धोका नसतो; पण हार्ट स्पेशॅलिस्ट म्हणून आम्हाला हार्ट अटॅकच्या कोणत्याही लक्षणांकडे जसे की महिलांचे छातीत दुखणे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.” (Photo : Freepik)

  • 4/9

    तंबाखूमध्ये हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) असते; जे चांगले कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी करते. त्याशिवाय तंबाखूच्या सेवनामुळे जळजळ होणे, रक्त गोठणे, रक्तवाहिन्या खराब होणे, इत्यादी कारणांमुळे हा धोका आणखी वाढतो. धूम्रपानामुळे पुरुष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका दोन ते चार पटींनी वाढला आहे. विशेषत: ज्या महिला धूम्रपान करतात त्यांना पुरुषांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका २५ टक्क्यांनी जास्त असतो. (Photo : Freepik)

  • 5/9

    ई-सिगारेटचे दैनंदिन सेवन करणे थेट हार्ट अटॅकला निमंत्रण देण्यासारखे आहे. तरुण महिलांमध्येही ई-सिगारेटचे सेवन दिसून येते; ज्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. निकोटिनच्या दुष्परिणामामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    महिलांमध्ये स्ट्रेस लेव्हल वाढवणारी एड्रेनालाइन आणि कॉर्टीसोल यामुळे रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ होऊ शकतात; ज्यामुळे अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. अनेकदा महिला अतिप्रमाणात धूम्रपान करतात. त्यामुळेही ताण वाढतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    जर तुम्ही हायपरटेन्सिव्ह असाल, तर गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असणारे हार्मोन्स रक्तदाब कसे वाढवतात, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. महिला अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब तपासत नाहीत. अनेकदा कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता, महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात; ज्याचा दुष्परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो. (Photo : Freepik)जर तुम्ही हायपरटेन्सिव्ह असाल, तर गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असणारे हार्मोन्स रक्तदाब कसे वाढवतात, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. महिला अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब तपासत नाहीत. अनेकदा कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता, महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात; ज्याचा दुष्परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो.जर तुम्ही हायपरटेन्सिव्ह असाल, तर गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असणारे हार्मोन्स रक्तदाब कसे वाढवतात, हे एका अभ्यासातून समोर आले आहे. महिला अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा रक्तदाब तपासत नाहीत. अनेकदा कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता, महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात; ज्याचा दुष्परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो.

  • 8/9

    चुकीच्या लाइफस्टाईलमुळेही थेट आरोग्यावर दुष्परिणाम होतो. लठ्ठपणा, सतत बसून काम करणे, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्य बिघडते आणि हे घटक मधुमेहासाठीही कारणीभूत असतात. एका अभ्यासात असे दिसून आले की, ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ११.२ टक्के आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि ज्यामुळे सुरळीत रक्तपुरवठा होऊ शकत नाही. (Photo : Freepik)

  • 9/9

    हार्ट अटॅक हा नेहमी पुरुषांसाठी चिंतेचा विषय मानला जातो; पण महिलांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्यामुळे महिलांनीही हार्ट अटॅकच्या लक्षणांपासून सावध राहणे तितकेच गरजेचे आहे. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. (Photo : Freepik)

TOPICS
जागतिक हृदय दिन २०२४World Heart Day 2023लाइफस्टाइलLifestyleहार्ट अटॅकHeart Attackहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: World heart day 2023 heart attack risk going up in young women at early age due unhealthy habits ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.