-
चुकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकदा आपल्याला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. याचा सर्वाधिक परिणाम आपल्या हार्टच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढलेले दिसून येतात. (Photo : Freepik)
-
हार्ट अटॅकचे प्रमाण हल्ली तरुणाईंमध्येही वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे आपले चांगले खानपान, चांगल्या आरोग्याच्या सवयी या खूप जास्त महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे आपण हार्ट अटॅकचा धोका कमी करू शकतो.
आज आपण हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आणि सुदृढ हार्टसाठी कोणते व्यायाम करावेत, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik) -
हार्टशी संबंधित आजारांचाही धोका कमी होतो पण जर तुम्हाला नियमित व्यायाम करायची आवड असेल तर तुम्ही काही एक्सरसाइज फॉलो करू शकता. (Photo : Freepik)
-
नियमित धावणे हार्टच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी नियमित वीस मिनिटे तरी धावणे गरजेचे आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहतं आणि हार्ट सुदृढ राहतं. (Photo : Freepik)
-
असं म्हणतात की योगाyoga हा फक्त शरीरामध्ये लवचिकता आणतो पण तुम्हाला माहिती आहे का हार्टच्या आरोग्यासाठीही योगा हा तितकाच महत्त्वाचा आहे. योगामुळे तुमचा हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. (Photo : Freepik)
-
स्विमिंग हा फक्त विरंगुळा म्हणून अनेक जण बघतात पण तुम्हाला माहिती आहे का हार्टच्या आरोग्यासाठी स्विमिंग बेस्ट व्यायाम आहे. स्विमिंगमुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि तुम्ही एनर्जेटिक राहू शकता. (Photo : Freepik)
-
शरीराची हालचाल ही हार्टच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अशात जर तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत शरीराच्या हालचाली करून व्यायाम करीत असाल तर याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे तुमच्या हार्टचे आरोग्य सुदृढ राहते. (Photo : Freepik)
-
अनेक जणांना डान्स करायला आवडते. मुळात डान्स हा व्यायामाचा बेस्ट पर्याय आहे. नियमित अर्धा तास डान्स केल्यामुळे आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. यामुळे हार्ट रेट ही कंट्रोलमध्येही राहतात. जर तुम्हाला काही तरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही झुम्बासुद्धा करू शकता. झुम्बाद्वारे तुम्ही खूप चांगला शरीराचा व्यायाम करू शकता. (Photo : Freepik)
-
जर तुम्हाला सायकल चालवायला आवडत असेल तर तुम्ही नियमित सायकल चालवा. सायकल चालविणे हा सुद्धा खूप चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचा हार्ट रेटही कंट्रोलमध्ये राहतो आणि तुमचं हार्ट सुदृढ राहण्यास मदत होते. (Photo : Freepik)
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? हे व्यायाम आवर्जून करा…
हार्टच्या आरोग्यासाठी काही व्यायामाचे प्रकार फायदेशीर असतात, ज्यामुळे हार्टशी संबंधित आजारांचाही धोका कमी होतो. आज आपण या व्यायाम प्रकारांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
Web Title: Heart attack news healthy lifestyle try these best exercises and avoid heart attack ndj