-
स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, स्क्रीन या सर्व उपकरणांचे आपल्या आयुष्यात एक अविभाज्य स्थान निर्माण झाले आहे. आवडते कार्यक्रम पाहण्यापासून, सोशल मीडियावर स्क्रोल करणे ते दिवसभर ऑफिसची कामे करण्यासाठी आपण स्क्रीन समोर कितीतरी वेळ खर्च करतो. त्यामुळे सध्या अनेकांना ‘डिजिटल आय स्ट्रेन’चा सामना करावा लागतो आहे. [Photo credit – Freepik]
-
मात्र, वाढत्या डिजिटल यंत्रांच्या, स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे ते पाहू. [Photo credit – Freepik]
-
२०-२०-२० नियम
डोळ्यांवर अधिक ताण पडू नये यासाठी’ २०-२०-२०’ नियमाचे पालन करा. यासाठी प्रत्येक २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी स्क्रीनवरील लक्ष काढून, साधारण २० फूट दूर असणाऱ्या वस्तूकडे पाहावे. असे केल्याने तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते आणि डोळ्यांच्या आरोग्यास फायदा होतो. [Photo credit – Freepik] -
लॅपटॉप स्क्रीन डोळ्यापासून किती दूर ठेवावी?
लॅपटॉपवर काम करताना त्यांची स्क्रीन एक हात अंतरावर असावी. लॅपटॉपची स्क्रीन ही आपल्या डोळ्याना समांतर असावी. तसेच, काम करताना हातदेखील शरीरास समांतर राहतील याची काळजी घ्या. [Photo credit – Freepik] -
स्क्रीन ब्राईटनेसची पातळी
स्क्रीनच्या निळ्या प्रकाशाने आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण पडतो. यावर उपाय म्हणून, तुमच्या उपकरणाचा ब्राईटनेस डोळ्यांना त्रास देणार नाही असा ठेवा; अथवा डार्क मोड किंवा नाईट मोड पर्यायचा वापर करा. [Photo credit – Freepik] -
डोळे मिचकावणे आणि त्यांचा ओलावा
डोळ्यांचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी मधूनमधून डोळे मिचकावणे फार महत्त्वाचे असते. म्हणून, स्वतःहून लक्षात ठेवून वरचेवर डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. अगदीच गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने साध्या आयड्रॉप्सचा वापर करावा. [Photo credit – Freepik] -
चांगल्या स्क्रीनचा वापर करावा
सतत पाहिली जाणारी स्क्रीन ही चांगल्या दर्जाची, रिझोल्युशनची असावी. तसेच स्क्रीन अँटी-ग्लेअर असावी. अँटी-ग्लेअर आपल्या डोळ्यांचे ब्राईटनेस, स्क्रीनचा प्रकाश यांपासून रक्षण करते. [Photo credit – Freepik] -
डोळ्यांची तपासणी करावी
मात्र, आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घेण्यासाठी वेळोवेळी डोळे तपासून घ्यावेत. तसेच डोळ्यांना काही त्रास होत असल्यास त्वरित त्यावर उपाय करण्याचा सल्ला बंगळुरूमधील नेत्रधामा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्री गणेश यांनी दिला आहे. [Photo credit – Freepik]
स्वतःच्या डोळ्यांचे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ पासून कसे कराल रक्षण? पाहा ‘हे’ सोपे उपाय…
दिवसभर स्क्रीनचा वापर करून डोळ्यांवर ताण येतो. मात्र, तसे होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या काही टिप्स वापरून पाहा.
Web Title: Computer vision syndrome how to protect eyes from digital strain use these useful tips dha