-
High Cholesterol Symptoms: मेणासारखा वाटणारा कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमून राहिल्यास रक्त प्रवाहात अडथळा येतो व परिणामी अनेक अवयवांना धोका असतो
-
कोलेस्ट्रॉल जितका वाईट तितकाच शरीराला आवश्यक सुद्धा आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार शरीरात टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजेन सह २० हुन अधिक आवश्यक हार्मोन्सची निर्मिती ही कोलेस्ट्रॉलमुळे शक्य होते
-
कोलेस्ट्रॉल शरीराच्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढवतो. मात्र जर या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर वाढू लागले तर मात्र शरीराला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आपण खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे जाणून घेणार आहोत
-
Scientific Based Homeopathy डॉ. मनदीप दहिया यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल मुळे त्वचेला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चेहऱ्याला रंग पांढरा किंवा पिवळसर दिसू शकतो.
-
आपल्या डोळ्यांच्या खाली, पाठीवर, हातापायावर सुद्धा घट्ट पिवळसर डाग दिसू शकतात. सतत चेहऱ्यावर रॅश व पुरळ येणे हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे.चेहऱ्याची त्वचा ही सुरकुतलेली व जाळीदार वाटत असल्यास शरीर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत देत असते
-
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायांच्या नसांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ब्लॉक होऊन गाठी होऊ शकतात यामुळे दोन्ही पायांच्या पोटऱ्या व तळव्यांमध्ये प्रचंड वेदना होऊ शकतात.
-
साधारणतः पायांच्या नखाचा रंग हा पांढरा व हलका गुलाबी असतो. अर्थात याचे कारण म्हणजे नखाच्या खाली असणाऱ्या मांसातील रक्तपेशी. जेव्हा कोलेस्ट्रॉलमुळे पायात नीट रक्तपुरवठा होत नाही तेव्हा नखं पिवळसर होऊ लागतात
-
अनेकदा चालताना अचानक पायात क्रॅम्प येतो, पाय मुरगळतो तसेच पायाला फोड येणे, खड्डे पडणे असेही त्रास यामुळे होऊ शकतात.
-
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले आहे के हे तपासण्यासाठी लिपिड टेस्ट किंवा रक्त तपासणी करणे हिताचे ठरेल. व यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही आहारात बदल करण्यासह आपल्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा, जेवणाची वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक हालचाल यावर लक्ष देणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
खराब कोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर, पायावर व नखांमध्ये दिसू शकतात ‘हे’ बदल; शरीराचा संकेत ओळखा
Bad Cholesterol Signs: या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर वाढू लागले तर मात्र शरीराला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढताच आपलंच शरीर आपल्याला काही संकेत देत असतं, ही चिन्हे कशी ओळखायची पाहूया..
Web Title: Bad cholesterol increased shows signs on face skin nails legs does yellow stains means cholesterol or jaundice body signs health svs