Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. should we heat honey or not read is honey healthy when heated ndj

मध गरम करावे की नाही? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

असं म्हणतात की मध कधीही गरम करू नये, कारण गरम केल्याने मध विषारी बनते. खरंच मध गरम केल्यानंतर विषारी होते?

March 17, 2024 11:50 IST
Follow Us
  • Should we heat honey
    1/9

    लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना मध खायला आवडते. मधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मधामध्ये अँटिबायोटिक आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. असं म्हणतात की मध कधीही गरम करू नये, कारण गरम केल्याने मध विषारी बनते. खरंच मध गरम केल्यानंतर विषारी होते? (Photo : Freepik)

  • 2/9

    याविषयी लेखक कृष अशोक यांनी त्यांच्या इन्स्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते सांगतात की, मध गरम केल्यामुळे विषारी किंवा हानिकारक होत नाही. (Photo : Freepik)

  • 3/9

    कृश पुढे सांगतात की, ” आजच्या काळात कच्चे, शुद्ध नसलेले मध धोकादायक ठरू शकते. कच्च्या मधापासून अनेकदा लहान मुलांना त्रास सहन करावा लागल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.” (Photo : Freepik)

  • 4/9

    ते पुढे सांगतात, ” पाश्चराइज्ड मध विकत घ्या आणि हवे तसे वापरा. जर तुम्ही जंगलातील कच्चे मध वापरत असाल तर लक्षात ठेवा, हे मध गरम केल्याने यातील सर्व पोषक घटक आणि एन्झाइम नष्ट होतात.” (Photo : Freepik)

  • 5/9

    मधामध्ये सर्व पोषक घटक आणि एन्झाइम हे फुलांपासून येतात. हे फूल नंतर फळ आणि भाजीपाल्यामध्ये रुपातंरीत होतात. आपण भाजीपाला शिजवतो, मग ते विषारी बनत नाही तर मध गरम केल्यावर कसं काय विषारी बनू शकते.” (Photo : Freepik)

  • 6/9

    या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज यांनी मध गरम करणे चांगले की वाईट या विषयी सविस्तर माहिती सांगितली. (Photo : Freepik)

  • 7/9

    आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज सांगतात, “मध गरम केल्यानंतर इतर घटकांबरोबर त्याचे सेवन करणे सोपे आहे, पण मधातील फायदेशीर एन्झाइम्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक कमी होऊ शकतात, ज्यामुळे मधाचे पौष्टिक मूल्य घसरू शकते.” (Photo : Freepik)

  • 8/9

    त्या पुढे सांगतात, “कच्चे मध हे नैसर्गिक असते, त्यामुळे त्यात अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात. मध अगदी कमी गरम करा, जे बेकिंग किंवा सॉस बनवताना कामी येऊ शकते. (Photo : Freepik)

  • 9/9

    “मध गरम करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, पण तुम्हाला मधाचे नैसर्गिक फायदे टिकवून ठेवायचे असेल तर कधीही कच्चे मध सेवन करणे चांगले आहे.” श्रुती भारद्वाज सांगतात (Photo : Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Should we heat honey or not read is honey healthy when heated ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.