• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. beat the summer heat with green leafy vegetable kulfa and know the health benefits asp

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ भाजीचा करा आहारात समावेश; शरीर राहील थंड

उन्हाळ्यात घोळाची भाजी खाण्याचे फायदे वाचा…

March 21, 2024 21:52 IST
Follow Us
  • Beat the summer heat with green leafy vegetable kulfa And Know The Health Benefits
    1/9

    उन्हाळा आला की अंगावर येणारा घाम, घशाला कोरड पडणे हे सर्व आलंच. त्यामुळे कंटाळून अनेक लोकांचा आहारही कमी होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    उन्हाळ्यात उलट्या, जुलाब, अपचन आदी अनेक पोटाच्या समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत पोट थंड ठेवणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    पालक, मेथी या हिरव्या पालेभाज्या तर आपण खातोच. पण, उन्हाळ्यात कुल्फा म्हणजेच घोळाची भाजीदेखील खाणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी तसेच द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नारायण हॉस्पिटल गुरुग्रामच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे व धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी या भाजीचे काही आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/9

    तर कुल्फा म्हणजेच घोळाची भाजी यामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 6/9

    याशिवाय घोळाची भाजी उष्माघात आणि घामोळे यासारख्या उष्णतेशी संबंधित आजारांवर एक पारंपरिक उपाय ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 7/9

    उन्हाळ्यात घोळाची भाजी खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवणे. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराबाहेर जो घाम बाहेर पडतो तो भरून काढण्यास मदत होते. शरीर थंड राहते व निर्जलीकरण टाळता येते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 8/9

    याव्यतिरिक्त घोळाची भाजीमध्ये कॅलरी कमी आणि आहारातील फायबर जास्त आहे; ज्यामुळे वजन व्यवस्थापन आणि पाचक आरोग्यासाठी ते उत्तम पर्याय ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 9/9

    घोळाची भाजी सॅलेडमध्ये तुम्ही कच्ची खाऊ शकता. तसेच स्टिर-फ्राइज (stir-fries) , सूप किंवा करी यांसारख्या विविध पदार्थांमध्ये ही भाजी घालून तुम्ही याचे सेवन करू शकता. या भाजीची किंचित तिखट चव कोणत्याही पदार्थाला स्वादिष्ट बनवते. (फोटो सौजन्य: @Freepik )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Beat the summer heat with green leafy vegetable kulfa and know the health benefits asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.