• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. apples offers relief for gastrointestinal issues like diarrhoea and constipation but depending on how they consumed asp

अतिसार, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी अशाप्रकारे करा सफरचंदाचे सेवन; पाहा तज्ज्ञ काय सांगतात

सफरचंद हे फळ अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य समस्यांवर एक चांगला उपाय आहे…

April 20, 2024 22:11 IST
Follow Us
  • Apples Offers Relief For Gastrointestinal Issues like Diarrhoea and Constipation But Depending On How They Consumed
    1/9

    ‘दिवसाला एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा’ असे अनेकदा म्हटले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहीत आहे का? सफरचंदाचे सेवन करणे अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य समस्यांवर एक चांगला उपाय ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे या फळाचे सेवन कराल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    पोषणतज्ज्ञ आणि कन्टेन्ट क्रिएटर दीपशिखा जैन यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करून सफरचंदाचे सेवन कसं केलं पाहिजे याच्या काही टिप्स सांगितल्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    ज्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरं जावं शकतं त्यांनी सफरचंद न सोलता खावे. तसेच अतिसाराची समस्या जाणवत असेल तर तुम्ही सफरचंदाचे साल काढून मग त्याचे सेवन करावे. तर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सफरचंद खाण्यापूर्वी त्याला शिजवून घेण्याचा सल्ला पोषणतज्ज्ञांनी दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    तर द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांनी सफरचंद खाण्याने अतिरिक्त पौष्टिक फायदे सांगितले आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    जीवनसत्त्वे आणि खनिजे – सफरचंद व्हिटॅमिन सी (C) चा चांगला स्रोत आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा मऊ आणि कोमल बनविण्यास मदत करते. याव्यतिरिक्त त्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक प्रमुख उपाय ठरते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    अँटिऑक्सिडंट गुणधर्म – सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनेक हानिकारक रेणूंपासून शरीराचे रक्षण करतात आणि जुनाट आजारांचा धोका कमी करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत – सफरचंदातील फायबर सामग्री कार्बोहायड्रेट शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Apples offers relief for gastrointestinal issues like diarrhoea and constipation but depending on how they consumed asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.