-
पावसाळ्यात थंडी, ताप, आणि सर्दी अशा अनेक आरोग्याची आव्हाने येतात. या ऋतूमध्ये रोगांपासून दूर आणि निरोगी राहण्यासाठी योगासन आणि प्राणायाम खूप फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया असे काही योगासन आणि प्राणायाम जे तुम्हाला पावसाळ्यात निरोगी आणि ठेवतील.
-
कपालभाती प्राणायाम केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. या प्राणायाममुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि श्वसनसंस्था मजबूत होते. पावसाळ्यात श्वसनाच्या समस्या आणि ऍलर्जीपासून बचाव करण्यासाठी हे प्राणायाम उपयुक्त आहे. या प्राणायामाच्या नियमित सरावाने पोटाचे स्नायूही मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते. -
नाडीशोधन प्राणायाम नाकातून श्वास घेऊन बाहेर सोडण्यावर आधारित आहे. या प्राणायामाला अनुलोम विलोम असेही म्हणतात. यामुळे मानसिक शांतता देखील मिळते आणि तणाव कमी होतो. यामुळे पावसाळ्यात श्वसनसंस्था स्वच्छ आणि फुफ्फुसे मजबूत राहण्यास मदत होते. -
अधो मुख स्वानासनामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि पचनक्रिया सुधारते. हे आसन केल्याने डोक्यात रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केस गळण्याची समस्याही कमी होतात. हे आसन मेंदू, डोळे आणि डोक्याच्या इतर भागांच्या समस्याही कमी करते. -
सेतुबंधासनाने पाठ आणि मान मजबूत होऊन शरीरातील थकवा कमी होतो. या आसनामुळे हृदयाची आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, यामुळे पावसाळ्यात श्वसनाच्या समस्या टाळता येतात. -
भुजंगासन मणक्याला मजबूत करण्यास मदत करते. हे आसन कोर मसल्स मजबूत करण्यासोबतच रक्तप्रवाह देखील सुधारतो. याशिवाय, हे आसन श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. -
नौकासनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि पावसाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे. -
शलभासनामुळे पाठीचा कणा, मान, छाती आणि खांदे मजबूत होतात आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराची लवचिकता वाढते. -
मत्स्यासनामुळे संपूर्ण शरीर मजबूत राहते. या आसनामुळे लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते. हे शरीरातील रक्त प्रवाह देखील सुधारू शकते. हे आसन ताणतणाव आणि श्वसनाच्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. -
जनु शिर्षासन पोटाच्या अंतर्गत अवयवांवर आणि स्नायूंवर अद्भुत प्रभाव पडतो. हे आसन शरीराचे वजन कमी करून रक्तदाब राखण्यास मदत करते. याशिवाय या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि तणाव कमी होतो. -
सर्वांगासन करणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे योगाआसन केल्याने हृदयात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रकारे होतो. हे नसा उघडण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. या योगाआसनामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
Monsoon Health: पावसाळी आजारांपासून दूर राहण्यासाठी घरच्याघरी करा ‘ही’ सोपी योगासने; जाणून घ्या इतर आरोग्य फायदे
पावसाळ्यात संसर्गाचा धोका असल्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. योगासन आणि प्राणायामाच्या मदतीने या समस्या टाळता येतात. पावसाळ्यासाठी काही योगासने आणि प्राणायामाचे फायदे जाणून घेऊया.
Web Title: Monsoon health do these easy yoga poses at home to avoid monsoon diseases know about other health benefits arg 02