• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you like writing then you make your best career in these field ndj

तुम्हाला लिहायला आवडते? ‘या’ क्षेत्रात घडवू शकता तुमचं करिअर

Writing Career : आज आपण लेखनाशी संबंधित क्षेत्रांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर घडवू शकता.

November 4, 2024 14:39 IST
Follow Us
  •  Writing: Career Opportunities
    1/9

    लेखन ही एक कला आहे. कल्पनाशक्ती, एखाद्या विषयासंबंधित उत्कटपणा, आणि क्रिएटिव्ही असेल तर तुम्ही उत्तम लेखन करू शकता. आजच्या काळात तुम्हाला जर उत्तम लेखन करता येत असेल, तर हे करिअरच्या दृष्टीकोनातून फायद्याचे ठरू शकते. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्ही यामध्ये करीअर घडवू शकता. फ्रिलान्सर, लेखक, पत्रकार, कॉपीरायटर- इत्यादी क्षेत्र तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. आज आपण लेखनाशी संबंधित क्षेत्रांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर घडवू शकता. (Photo : Freepik)

  • 3/9

    कन्टेट रायटर
    कन्टेट रायटर हे वेबसाइट आणि ब्लॉगसाठी लिहितात. प्रत्येक क्षेत्रात कन्टेट रायटरसाठी संधी उपलब्ध असतात. सध्या प्रत्येक कंपनी अशा लेखकाच्या शोधात आहे ज्यांना गुगल सर्च रिझल्टमध्ये मजकूर चांगला रँक मिळवण्यासाठी SEO (Search Engine Optimization) माहीत आहे. यांना नवीन विषयावर लिहिण्यासाठी संबंधित विषयावर संशोधन सुद्धा करावे लागते. (Photo : Freepik)

  • 4/9

    ब्लॉगर
    आजच्या डिजिटल जगात लेखकांसाठी अनेक संधी वाढल्या आहेत. तुम्ही जर उत्तम लेखन करत असाल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. तुम्हाला आवडत्या क्षेत्रात तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. फूड, फॅशन, म्युझिक, ट्रॅव्हल, इत्यादी आवडीनुसार तुम्ही तुमचे विषय निवडू शकता. तुमचे लेखन कौशल्ये सुधारण्यासाठी ब्लॉगिंग हा चांगला पर्याय आहे. तुम्ही इतर लोकांसाठी सुद्धा लेखन करू शकता. (Photo : Freepik)

  • 5/9

    सहाय्यक लेखक
    एखाद्या व्यवसायिकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे, नेहमी फायद्याचे ठरते. त्यांच्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकू शकता आणि तुमच्या कामामध्ये प्रगती करू शकता. सहाय्यक लेखक हे सहसा टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात काम करतात. ते लेखकांना संबंधित विषयांवर संशोधन करण्यास आणि लेखन आकर्षक करण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    ट्रान्सक्रिप्शनिस्ट
    ट्रान्सक्रिप्शनिस्ट म्हणजे ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग ऐकुन लेखन करणे, होय. या कामासाठी अचूकता, गोपनीयता आणि कामाची मुदत पूर्ण करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. ट्रान्स्क्राबरला शब्द किंवा भाषा समजून घेण्यासाठी संशोधन देखील करावे लागते. (Photo : Freepik)

  • 7/9

    फ्रिलान्सर लेखक
    जर तुमच्याकडे लेखनाची कला असेल आणि तुम्हाला नियमित ९ ते ५ नोकरी करण्यात रस नसेल तर तुम्ही फ्रिलान्स लेखन करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. (Photo : Freepik)

  • 8/9

    अनुवादक
    जर तुम्हाला दोन तीन भाषा अवगत असेल किंवा एखादी परदेशी भाषा लिहिता किंवा बोलता येत असेल तर तुम्ही अनुवादक हा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत अनुवादित करत असाल तर तुम्ही यामध्ये करिअर निवडू शकता. (Photo : Freepik)

  • 9/9

    कॉपीरायटर
    जाहिरात आणि मार्केटिंग एजन्सीमध्ये कॉपीरायटरची सर्वात जास्त आवश्यकता असते. क्लायंटच्या आवश्यकतांनुसार मूळ मजकूर प्रत तयार करणे, हे कॉपीरायटरचे काम असते.
    कॉपीरायटर हे ग्राहकांबरोबर त्यांच्या मजकुराद्वारे संवाद साधतात व त्यांना लेखनाद्वारे वस्तु खरेदी करण्यास आकर्षित करतात. कॉपीरायटरकडे मार्केटिंग कौशल्य असणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)

TOPICS
करिअरCareerजॉबJobसरकारी नोकरीGovt Jobs

Web Title: Do you like writing then you make your best career in these field ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.