-
बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी बदाम खाणे किती गरजेचे आहे हे आपल्याला नेहमी समजावले जाते. परंतु, या बदामाचा हा एकच उपयोग आहे का? बदामाचे विश्लेषण “संपूर्ण आरोग्यासाठी आदर्श बिया” यातून केले जाते.
-
अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांनी भरलेले असे हे बदाम आपल्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहेत.
-
बदामामध्ये निरोगी चरबी किंवा फॅट्सचा समावेश असल्यामुळे ती कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यास मदत करते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते.
-
२८.३५ ग्राम बदामामध्ये अंदाजे १६४ कॅलरी, ६ ग्राम प्रोटिन, १४ निरोगी फॅट्स आणि ३.५ ग्राम फायबर, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असल्यामुळे बदाम हा आहारात समाविष्ट करून घेण्यासाठी एक आरोग्यसंपन्न घटक आहे.
-
भिजवलेल्या बदामाचे पाच निरोगी फायदे ;
मेंदूचे योग्य चलन : बदाम मेंदूचे चलन सुधारण्यासाठी ओळखले जाते आणि जर भिजवलेले बदाम असले तर या सुधारणेवर आणखी भर पडते. व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंटने भरपूर भिजवलेले बदाम ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्ती देते. -
ऊर्जा पातळीत वाढ : भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने शरीराला दिवसभर उत्स्फूर्त ठेवण्याचे शक्ती मिळते. प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे ऊर्जा शक्ती कायम ठेवण्यास मदत करते. बदामाचा आहार नियमितपणे केला तर हृदय विकारांशी लढण्यास मदत होते.
-
वजनात घट : वजन कमी करण्यासाठी बदामाची मदत होते. बदामामध्ये असलेल्या फायबर आणि प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे जास्त भूक लागत नाही आणि शरीरात कॅलरीचे प्रमाणही घटत जाते.
-
पोषणाने भरपूर : बदाम मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध असतात, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
-
बदाम भिजवल्यामुळे या पोषणतत्त्वांची शोषण क्षमता वाढते. भिजवलेले बदाम हे एक खूप पौष्टिक आणि ताकदीने भरलेलं स्नॅक बनतात, जे तुमचं एकूण आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतात.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स/ पिक्साबे )
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)