• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how much water you drink every day what is the right way to hydrate your body know what expert says snk

तुम्ही रोज ८ ग्लास पाणी पिता का? शरीरातील पाण्याची पातळी राखण्याची योग्य पद्धत जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

What is the right way to hydrate your body : शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचे महत्त्व पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या

November 22, 2024 14:50 IST
Follow Us
  • आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे, असे लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषणतज्ज्ञ सांची तिवारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. 
    1/13

    आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे, असे लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषणतज्ज्ञ सांची तिवारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. 

  • 2/13

    सांची यांनी शरीरातील पाण्याचा पातळी (हायड्रेटेड) राखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि पिण्याच्या पाण्याबद्दलचे सामान्य गैरसमज स्पष्ट केले.

  • 3/13

    दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे, असा नियम आहे आणि तुमच्या शरीराला कधी पाण्याची गरज आहे हे कळते

  • 4/13

    तुम्हाला तहान लागल्याचे संकेत ओळखा. कारण- तो तुमच्या शरीरात पुरेशी पाण्याची पातळी राखण्याचा नैसर्गिक मार्ग आहे, असे तिवारी यांनी सांगितले

  • 5/13

    आपल्याला किती पाण्याची आवश्यकता आहे यावर परिणाम करू शकणारे काही घटक खालीलप्रमाणे :

  • 6/13

    व्यायाम : व्यायाम किंवा गरम हवामानात जास्त घाम येतो? त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अधिक पाणी प्या. जास्त शारीरिक हालचालींमुळे घामाद्वारे शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिक पाणी पिणे आवश्यक आहे.

  • 7/13

    वय : लहान मुले आणि वृद्धांच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. कारण- तहान लागल्याचे संकेत त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीत.

  • 8/13

    वैद्यकीय स्थिती : मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांसारख्या काही वैद्यकीय परिस्थिती द्रवपदार्थाच्या गरजांवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • 9/13

    ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये किंवा खाद्यपदार्थ घामाद्वारे गमावलेली खनिजे भरून काढण्यास मदत करू शकतात.

  • 10/13

    जास्त प्रमाणात पाणी पिणे
    शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे ही चिंताजनक बाब आहे; परंतु गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणे धोकादायकही असू शकते. तिवारी यांनी स्पष्ट केले की, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी चांगले नाही. कारण- ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स वापरते आणि तुमच्या हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो.

  • 11/13

    पाणी अत्यावश्यक असले तरी, इतर पेये आणि खाद्यपदार्थ शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यात योगदान देऊ शकतात हे तिवारी यांनी मान्य केले. “काही लोक भरपूर कॉफी किंवा चहा पितात; ज्यामुळे काही प्रमाणात का होईना शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यात मदत मिळते. पण, टरबूजसारखी फळेदेखील शरीरातील पाण्याती पातळी वाढविण्यासाठी उत्तम आहेत. जसे की- फ्रूटी मिल्क आणि फळांचे रस. त्याव्यतिरिक्त उच्च पाण्याचे प्रमाण असलेली फळे आणि भाज्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याचे उत्कृष्ट स्रोत असू शकतात.

  • 12/13

    शरीरातील पाण्याची पातळी राखण्याबाबत गैरसमज दूर करा
    शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन आणि तुमच्या आहारामध्ये शरीरातील पाण्याची पातळी वाढविणाऱ्या विविध पर्यायांचा समावेश करून, तुम्ही तुमच्या शरीराची कार्ये उत्तम प्रकारे होत असल्याची खात्री करू शकता. 

  • 13/13

     म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पाणी प्याल तेव्हा लक्षात ठेवा की, तुम्ही फक्त तुमची तहान भागवत नाही, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराला आवश्यक इंधन देत आहात.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: How much water you drink every day what is the right way to hydrate your body know what expert says snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.