-
हिवाळ्यात तापमान कमी होते आणि त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो. प्रौढांसाठी सामान्य रक्तदाबाची पातळी ही १२०/८० (mmhg) पेक्षा कमी असते. पहिला आकडा हा सिस्टोलिक दाब (हृदयाचे ठोके सुरू असताना धमन्यांमध्ये तयार होणारा दाब); तर दुसरा आकडा हा डायस्टोलिक दाबाचा (जेव्हा तुमचे हृदय दोन ठोक्यांमध्ये थांबते तेव्हा धमन्यांमध्ये तयार होणारा दाब) असतो. (Photo : Freepik)
-
भारतीयांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या दिसून येतात. जसे की लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा एखादा आनुवंशिक आजार किंवा समस्या; ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. त्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)
-
हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो? आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. शेट्टी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे. (Photo : Freepik)
-
हिवाळ्यात शरीरातील उष्णता आवश्यक तितक्या प्रमाणात टिकवताना रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्त वाहताना अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो.
लोक हिवाळ्यात खूप जास्त जेवण अन् कमी व्यायाम करतात आणि त्यामुळे हिवाळ्यात थोडे वजन वाढते. या कारणानेही रक्तदाब वाढू शकतो. (Photo : Freepik) -
कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. त्यामुळेसुद्धा उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तसेच, वातावरण थंड असल्यामुळे कमी घाम येतो. शरीरात पाणी जास्त साठते आणि रक्ताचे प्रमाण आणखी वाढते. या कारणानेसुद्धा रक्तदाब वाढतो. (Photo : Freepik)
-
जर तुमचा रक्तदाब १२०/८० mmHg पेक्षा थोडा जास्त असेल आणि तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल, तर हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढू शकतो. लठ्ठपणा किंवा खराब कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या असतील, तर हा धोका आठ पटींनीन वाढतो. (Photo : Freepik)
-
रक्तदाब वाढल्याने हृदयाला रक्त पोहचविणे अधिक कठीण होते आणि त्यामुळे डाव्या बाजूचे व्हेंट्रिकल किंवा खालील चेंबर घट्ट आणि मोठे होते. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या खराब होऊन, रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते.
परिणामत: प्लेक तयार होऊ शकतात. या प्लेकमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयातील रक्तप्रवाहात अडचणी निर्माण होतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. (Photo : Freepik) -
मधुमेहासारख्या इतर समस्यांवर योग्य उपचार करा. झोपेची गुणवत्ता आणि इतर जीवनशैलीशी संबंधित बाबी म्हणजे आहार व नियमित व्यायाम यांवर लक्ष केंद्रित करा.
जर तुमचा रक्तदाब वाढला असेल, तर नियमित तपासणी करा. आठवडाभर दर दिवशी सकाळी आणि सायंकाळी, असा दोन वेळा रक्तदाबाची तपासणी करा. (Photo : Freepik) -
तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित असेल, तर आठवड्यातून एकदा तो तपासा. जर अचानक रक्तदाबाची पातळी वाढली, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही वेळा हिवाळ्यात तुम्हाला रक्तदाबाच्या गोळ्यांचा डोस वाढवावा लागू शकतो. (Photo : Freepik)
हिवाळ्यात Heart Attack चा धोका का वाढतो? जाणून घ्या खरं कारण
Heart Attacks During Winter : हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो? आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. शेट्टी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.
Web Title: Why heart attack risks increasing during winter ndj