• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. if you stop drinking milk tea for a month six positive changes will happen to your body asp

एक महिना दुधाचा चहा पिणे सोडल्यास तुम्हाला फायदा होईल की नुकसान?

Milk Tea Side Effect : आपल्यातील अनेकांच्या सकाळची सुरुवात एका कप गरम दुधाच्या चहाने होते आणि नाही, नाही म्हणता झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते

March 2, 2025 20:07 IST
Follow Us
  • When you stop drinking milk tea
    1/9

    दुधाचा चहा म्हणजे भारतीयांचे पहिले प्रेम. आपल्यातील अनेकांच्या सकाळची सुरुवात एका कप गरम दुधाच्या चहाने होते आणि नाही, नाही म्हणता झोप किंवा थकवा कमी करण्यासाठी दिवसभरात अनेक वेळा चहाचे सेवन केले जाते. पण, दुधाच्या चहाचे तुमच्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही… तर एक महिना दुधाचा चहा न प्यायल्यास तुमच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात याबद्दल जाणून घेऊ… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    दुधाच्या चहामध्ये कॅफिन, साखर व टॅनिनचे प्रमाण जास्त असते. याच्या अतिसेवनाने तुमच्या आरोग्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते…
    १. कॅफिन – कॅफिन तुमच्या शरीराला उत्तेजित (बूस्ट) करते, जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. त्याचबरोबर तुमची चिंता आणि हृदय गतीदेखील वाढवू शकते.
    २. साखर – अतिरिक्त साखर तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह व दातांच्या समस्यांना सामोरे जाण्यास कारणीभूत ठरू शकते.
    ३. टॅनिन – टॅनिन शरीरातील पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणतो, ज्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर महिनाभर दुधाचा चहा प्यायला नाही तर काय होईल?
    १. वजन कमी करणे शक्य – दुधाच्या चहामध्ये असलेले कॅलरीज आणि साखर हे घटक वजन वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊन, तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
    २. पचन सुधारण्यास मदत – दुधाच्या चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिनमुळे पचन मंदावते आणि ॲसिडिटीची समस्या वाढतात. दुधाचा चहा कमी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    ३. झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा – कॅफिनमुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. दुधाचा चहा कमी केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
    ४. चमकदार त्वचेचा लाभ – दुधाच्या चहामध्ये असलेल्या साखरेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि मुरमे येऊ शकतात. दुधाच्या चहाचे सेवन कमी केल्याने तुमची त्वचा निरोगी, चमकदार दिसेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    ५. दिवसभराचा उत्साह – दुधाचा चहा प्यायल्याने सुरुवातीला ऊर्जेचे प्रमाण वाढते; पण नंतर थकवा जाणवतो. दुधाचा चहा कमी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होईल.

  • 6/9

    ६. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत – दुधाचा चहादेखील हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे दुधाचा चहा न प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    कशी सोडावी दुधाचा चहा पिण्याची सवय ?
    आपल्यातील अनेकांना चहा पिण्याची इतकी सवय असते की, ती सोडणे खूप कठीण जाते. मग अशा वेळी चहा पिण्याची सवय हळूहळू कमी करा. दुधाचा चहा एकाच वेळी पूर्णपणे बंद करण्याऐवजी या पद्धतीचा अवलंब करून बघा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    दुधाच्या चहाऐवजी तुम्ही हर्बल टी, ग्रीन टी किंवा फळांचा रस पिऊ शकता.

  • 9/9

    तुम्ही कमी साखर किंवा साखरविरहीत दुधाचा चहा बनवू शकता.
    जेव्हा तुम्हाला दुधाचा चहा प्यावासा वाटतो तेव्हा स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: If you stop drinking milk tea for a month six positive changes will happen to your body asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.