• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tips when buying raw black peppercorn kali mirch powder or other food products asp

काळी मिरी भेसळयुक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टी मिक्स केल्या जातात? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

Tips To Check Kali Miri : अनेक अभ्यासकांनी काळी मिरी आणि मिरपूडमध्ये मिसळलेली विविध प्रकारची रसायने किंवा इतर उत्पादने शोधून काढली आहेत.

March 20, 2025 22:15 IST
Follow Us
  • tips when buying raw black peppercorn
    1/10

    काळी मिरी हा स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. काळी मिरीतील काही घटक जेवणातील पदार्थ चविष्ट बनवतात. पण, अलीकडच्या काळात मार्केटमधून आणलेली काळी मिरीदेखील भेसळयुक्त निघते आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नफा वाढवण्यासाठी काळी मिरीमध्ये अनेक स्वस्त उत्पादने आणि रसायने मिसळली जात आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/10

    अनेक अभ्यासकांनी काळी मिरी आणि मिरपूडमध्ये मिसळलेली विविध प्रकारची रसायने किंवा इतर उत्पादने शोधून काढली आहेत. यातील काही रसायने इतकी विषारी असतात की, त्यामुळे हृदय निकामी होणे, मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे, यकृताचे विकार होणे आदी समस्या उद्भवू शकतात; असे पोषणतज्ज्ञ आणि डाएट Ryt च्या संस्थापक आणि सीईओ रुपीत कौर म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/10

    काळी मिरी भेसळयुक्त होण्यासाठी पुढील गोष्टी मिक्स केल्या जातात…
    १. पपईच्या बिया –
    पपईच्या बिया सुकल्यानंतर काळ्या मिरीसारख्या दिसतात. त्यांचा आकार आणि रंग अगदी जवळजवळ सारखाच असतो, त्यामुळे पपईच्या बिया थेट काळी मिरीमध्ये मिसळल्या जातात, कारण त्या खूपच स्वस्त असतात. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 4/10

    काळ्या मिरीमध्ये पपईच्या बिया आहेत हे कसे ओळखाल?
    एक ग्लास पाण्यात काळी मिरी घाला. तुमचा ग्लास पारदर्शक असेल याची खात्री करा. मिरपूड किंवा मिरची पावडर काचेच्या तळाशी स्थिर होईल, तर पपईच्या बिया किंवा पावडर पृष्ठभागावर तरंगत राहतील. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/10

    २. खनिज तेल – काळी मिरी किंवा मिरपूड आकर्षक दिसण्यासाठी आणि त्याचे वजन वाढवण्यासाठी खनिज तेलाचा वापर केला जातो. ही प्रक्रिया मिरपूडचे स्वरूप वाढवण्यासाठी आणि खरेदीदारांना अधिक आकर्षित करण्यासाठी वापरली जाते. पण, खनिज तेल हे मानवी वापरासाठी अत्यंत हानिकारक आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/10

    काळ्या मिरीमध्ये खनिज तेल आहे हे कसे ओळखाल?
    एक ग्लास पाण्यात मिरी पावडर किंवा मिरपूड घाला आणि थोडा वेळ ढवळून घ्या. जर पृष्ठभागाच्या पाण्यावर किंवा तेलाच्या थेंबांवर तेलाची फिल्म (film) किंवा थर तयार होत असेल तर याचा अर्थ मिरपूडमध्ये खनिज तेल मिसळले आहे. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/10

    ३. भुसा (Sawdust) – खर्च कमी करण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी काळ्या मिरीमध्ये भुसा मिसळला जातो. भुसाचा रंग मिरपूड पावडरसारखाच असतो, जो पाहताक्षणी ओळखता येत नाही. पण, जेव्हा तुम्ही त्याची चव चाखता तेव्हा तुम्ही फरक ओळखू शकता. भुसा मिसळलेल्या काळ्या मिरीमध्ये मिरी पावडरच्या तुलनेत खूपच कमी मसाला असतो. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/10

    काळ्या मिरीमध्ये भुसा आहे हे कसे ओळखाल?
    जर तुम्ही एक ग्लास पाण्यात मिरी पावडर घातली तर भुसा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागतो आणि मिरपूड तळाशी स्थिर होते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/10

    ४. शिशाचे कोटिंग
    शिशाचा वापर immature काळी मिरीच्या दाण्यांवर कोट म्हणून केला जातो, जेणेकरून ते पूर्णपणे immature मिरपूडसारखे दिसावेत. शिशाच्या लेपामुळे मिरपूड चमकदार दिसतात. शिशाचे लेप काळी मिरीचे वजन वाढवण्यासही मदत करते. पण, शिसे असलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.काळ्या मिरीमध्ये शिशाची उपस्थिती आहे की नाही हे आपण घरी तपासू शकत नाही. अशा चाचण्या प्रयोगशाळांमध्ये व्यावसायिकांच्या निरीक्षणाखाली केल्या जातात, असे रुपीत कौर म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 10/10

    काळी मिरी किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना पुढील टिप्स लक्षात ठेवा…
    १. काळी मिरी विश्वसनीय ठिकाणाहून खरेदी करा.
    २. काही सूट किंवा अतिरिक्त भेटवस्तूंसाठी स्वस्त वस्तूंच्या मागे अजिबात लागू नका.
    ३. पॅकेजिंगवर सरकारी प्रमाणपत्र आहे का पाहून घ्या. पॅकेजिंगवर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे (FSSAI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    ४. तुम्ही Agmark किंवा इतर सेंद्रिय लेबल्ससारखी गुणवत्ता तपासणी लेबलेदेखील चेक करू शकता.
    ५. अनैसर्गिकपणे चमकदार आणि रेखीव दिसणारी उत्पादने खरेदी करू नका. (फोटो सौजन्य : @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Tips when buying raw black peppercorn kali mirch powder or other food products asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.