Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these five foods naturally improve insulin sensitivity in the body ayurveda also use spl

आयुर्वेदानं प्रभावी औषधी म्हणून मान्यता दिलेले ‘हे’ ५ पदार्थ शरीरामधली इन्सुलिनची पातळी वाढवतात…

Natural ways to improve Insulin sensitivity: आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन जर योग्यरित्या तयार होत असेल तेव्हाच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आयुर्वेदानुसार, हे पाच पदार्थ शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्याचं काम करतात.

Updated: August 26, 2025 19:56 IST
Follow Us
  • these five foods naturally improve insulin sensitivity in the body ayurveda also use
    1/14

    मधुमेहाच्या रुग्णांची संख्या केवळ भारतातच नाही तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा एक असाध्य आजार आहे जो खाण्याच्या वाईट सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. (Photo: Freepik)

  • 2/14

    मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य आहार घेणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे. तसेच आयुर्वेदानुसार, त्यावर नियंत्रण मिळवणेही शक्य होऊ शकते. (Photo: Unsplash)

  • 3/14

    आयुर्वेद ही भारतातील पारंपरिक वैद्यकीय प्रणाली आहे जी आजच्या काळात अधिकाधिक लोक पुन्हा स्वीकारताना दिसत आहेत. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. यासोबतच, सर्वात गंभीर आजारांवरही आयुर्वेदाद्वारे उपचार करता येतात. (Photo: Freepik)

  • 4/14

    रक्तातील साखर आणि चयापचयाचे संतुलन राखण्यासाठी आयुर्वेद आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याची शिफारस करतो. चला जाणून घेऊया: (Photo: Freepik)

  • 5/14

    आवळा
    आवळा हा व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि स्वादुपिंड मजबूत करण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे योग्य उत्पादन होण्यास मदत होते. (Photo: Freepik)

  • 6/14

    सेवन करण्याची योग्य पद्धत:
    सकाळी आवळ्याचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, पावडर आणि सॅलडच्या स्वरूपात देखील सेवन केले जाऊ शकते. (Photo: Freepik)

  • 7/14

    मेथी:
    मेथीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते जे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतो, ज्यामुळे अन्न हळूहळू पचते. व रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही. (Photo: Freepik)

  • 8/14

    सेवन कसे करावे:
    मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. (Photo: Freepik)

  • 9/14

    कारलं
    कारल्यामध्ये कॅरॅन्टीन आणि पॉलीपेप्टाइड-पी नावाचे विशेष संयुगे असतात जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. (Photo: Unsplash)

  • 10/14

    कारलं कसं खाव:
    सकाळी रिकाम्या पोटी त्याचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Photo: Freepik)

  • 11/14

    हळद
    आयुर्वेदात हळदीचा वापर औषध म्हणून केला जातो. त्यात कर्क्यूमिन नावाचे संयुग असते जे जळजळ कमी करते आणि शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यास मदत करते. (Photo: Unsplash)

  • 12/14

    कसे सेवन करावे:
    सकाळी कोमट पाण्यात किंवा दुधात हळद मिसळून सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. (Photo: Pexels)

  • 13/14

    दालचिनी
    दालचिनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील रामबाण उपाय ठरू शकते. ती पचनक्रिया जलद करते आणि इन्सुलिन संवेदनशील बनवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर नियंत्रित होते. (Photo: Pexels)

  • 14/14

    कसे सेवन करावे:
    दालचिनीची चहा पिऊन किंवा पाण्यात उकळून तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही ते तुमच्या जेवणात देखील समाविष्ट करू शकता. (Photo: Pexels) हेही पाहा- तणावमुक्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात ‘या’ सोप्या १० गोष्टींवर काम करा…

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: These five foods naturally improve insulin sensitivity in the body ayurveda also use spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.