-
नारळ पाणी हे एक नैसर्गिक आणि हायड्रेटिंग पेय आहे ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्याच्या सेवनाने अनेक समस्या दूर होऊ शकतात. नारळ पाणी सर्वात शुद्ध आणि सुरक्षित मानले जाते. बरेच लोक नारळाचे पाणी थेट पितात. परंतु त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. (Photo: Freepik)
-
नारळ फोडल्यानंतर, ते गरम आणि दमट वातावरणाक ठेवल्याने त्यात धोकादायक बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते जी बाहेरून आपल्या डोळ्यांना दिसत नाही. (Photo: Unsplash)
-
एका अभ्यासानुसार, जर नारळ योग्य आर्द्रता असलेल्या ठिकाणी ठेवला नाही तर तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. (Photo: Unsplash)
-
संक्रमित नारळाच्या पाण्यामुळे या समस्या उद्भवू शकतात
पचन समस्या
संक्रमित नारळाच्या पाण्यात बॅक्टेरिया वाढू शकतात किंवा ते जास्त काळ साठवून ठेवल्यास ते वाढू शकतात, ज्यामुळे उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे सामान्य अन्न विषबाधेसारखी वाटतात, ज्यामुळे लोक ते ओळखू शकत नाहीत. (Photo: Freepik) -
मज्जासंस्थेवर परिणाम
काही बुरशींद्वारे तयार होणारे विष (जसे की 3-NPA) थेट मेंदू आणि नसांवर परिणाम करतात. यामुळे चक्कर येणे आणि स्नायूंमध्ये तणाव देखील येऊ शकतो. (Photo: Freepik) -
श्वास घेण्यास त्रास:
बुरशी वाढलेले नारळ पाणी पिल्याने श्वास घेण्यास त्रास, छातीत जळजळ आणि फुफ्फुसांमध्ये पाणी भरणे या समस्या होऊ शकतात. (Photo: Freepik) -
कसे सेवन करावे
१- नारळाचे पाणी थेट कवचातून पिणे योग्य नाही. कारण त्यामध्ये बुरशी असू शकते. ते पिण्याचा योग्य मार्ग म्हणजे नारळ फोडून, स्वच्छ पाणी एका भांड्यात काढून मग ग्लासमधून पिणे (Photo: Unsplash) -
२ – नारळ आणि त्याचे पाणी सेवन करण्यापूर्वी ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे चांगले. यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखली जाते. (Photo: Unsplash)
-
३- जर नारळाच्या पाण्याची चव बदलली आहे, त्याचा वास वाईट येत असेल, रंग बदलत असेल आणि पाणी चिकट असेल तर ते पिऊ नये. (Photo: Unsplash) हेही पाहा-
थेट नारळ पाणी पिणे योग्य नाही? मग योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या…
Coconut water drinking safety tips: नारळ पाणी सर्वात शुद्ध मानले जाते. पण आपण ते थेट प्यावे की नाही? ते पिण्याचा योग्य मार्ग कोणता?
Web Title: Should drink coconut water directly right way to consume it spl