-
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की नियमितपणे केलेले मध्यम-तीव्रतेचे व्यायाम रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. ते आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी करून पचनक्रिया सुधारून कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतात.
-
जलद चालणे: अभ्यासातून असे दिसून आले आहे की आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटे जलदगतीने चालल्याने रक्ताभिसरण सुधारू शकते आणि कर्करोगाच्या वाढीचा धोका कमी होऊ शकतो.
-
रक्तप्रवाह सुधारतो: रक्ताभिसरण चांगले होते म्हणजे तुमच्या पेशींपर्यंत जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात, ज्यामुळे तुमचे शरीर आतील कँसरच्या वाढीसाठी अनुकूल राहत नाही.
-
हार्मोन्स संतुलित करते: व्यायामामुळे इन्सुलिन आणि इस्ट्रोजेनची पातळी नियंत्रित होते, ज्यामुळे स्तन आणि एंडोमेट्रियल कर्करोगासारख्या हार्मोनशी संबंधित कर्करोगाचा धोका कमी होतो.
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: वेगाने चालल्याने नैसर्गिक किलर (एनके) पेशी वाढतात, ज्या कॅन्सरच्या पेशी ओळखण्यात आणि नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
-
क्रॉनिक इन्फ्लेमेशन कमी करते: दीर्घकालीन जळजळ (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देते. नियमित चालण्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते.
-
मानसिक आरोग्याला मदत करते: चालण्यामुले तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे कर्करोगाच्या प्रतिबंधात मदत होते.
हेही पाहा- सावधान! बाहेरून आणलेला पनीर खाण्याचे ‘हे’ धोके माहितीयेत का?
‘या’ सामान्य व्यायामामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ खरोखरच मंदावते का?
आज आपण कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करू शकणारा एका साध्या व्यायामाबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Heres an exercise that could slow cancer cell growth marathi information spl