• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bottle gourd side effects who should avoid eating dudhi bhopla health tips in marathi spl

‘या’ लोकांसाठी विषासमान आहे दुधी भोपळा, चुकूनही खाऊ नका; अथवा बिघडेल आरोग्य…

Bottle gourd side effects: दुधी भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, ते काही लोकांसाठी मात्र हानिकारकही ठरू शकते.

Updated: September 23, 2025 13:19 IST
Follow Us
  • bottle gourd side effects who should avoid eating lauki
    1/9

    दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीजंच प्रमाण कमी असतं, त्यात शरीराल आवश्यक पोषक तत्वे आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. दुधी भोपळ्यास आपण भाजी, सूप किंवा ज्यूस बनवून खातो. दुधी भोपळा वजन कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. पण, असं असलं तरी त्याचे अनेक तोटेदेखील आहेत. (Photo: Freepik)

  • 2/9

    आरोग्याच्या काही समस्यांमध्ये भोपळा खाणे हानिकारक ठरु शकते. गर्भवती महिलांसाठी तसेच रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांसाठी दुधी भोपळा खाणे हानिकारक असू शकते. (Photo: Pexels)

  • 3/9

    गर्भावस्थेतील धोके:
    गर्भवती महिलांना भोपळा खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यात काही विषारी पदार्थ असतात जे बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतात. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान भोपळा जास्त प्रमाणात खाऊ नये असा सल्ला दिला जातो. (Photo: Unsplash)

  • 4/9

    कमी रक्तदाब असलेल्यांसाठी हानिकारक:
    दुधी नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते. म्हणून, उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी ते फायदेशीर असले तरी, कमी रक्तदाब असलेल्यांसाठी ते धोकादायक ठरू शकते. दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने चक्कर येणे, थकवा येणे किंवा अगदी तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता. (Photo: Unsplash)

  • 5/9

    मूत्रपिंडांवर परिणाम:
    दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे सामान्य लोकांसाठी फायदेशीर असते, परंतु ते मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून, त्याचे सेवन टाळावे. (Photo: Freepik)

  • 6/9

    पचन समस्या
    दुधी भोपळा पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण त्यात पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. पण, ज्यांना गॅस, पोटफुगी किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांनी त्याला खाणे टाळावे. विशेषतः, रात्रीच्या जेवणामध्ये दुधी खाणे टाळावे. पचनसंस्था कमजोर असलेल्या लोकांना दिवसा मर्यादित प्रमाणात दुधी खाण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)

  • 7/9

    दुधी भोपळ्याचा रस
    दुधीचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु जर दुधी कडू असेल तर हानिकारक ठरु शकते. कडू दुधीच्या रसामुळे उलट्या, अतिसार, तीव्र पोटदुखी आणि गंभीर विषबाधा होऊ शकते. अशा परिस्थितीत, रस बनवण्यापूर्वी दुधीचा तुकडा चाखून पहा. जर त्याची चव कडू असेल तर त्याचा रस बनवू नये. (Photo: Unsplash)

  • 8/9

    कडू भोपळा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे?
    दुधीमध्ये येणारा कडूपणा त्याच्यातील विषारी संयुग, क्युकरबिटासिनमुळे असतो, ज्यामुळे त्याला खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. (Photo: Pexels)

  • 9/9


    कसा दुधी भोपळा खावा
    दुधी हा व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे, जो हृदय आणि पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. तो वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करतो. त्यामुळे नेहमी ताजा आणि कडू नसलेला दुधी भोपळा खा. जर दुधी कडू असेल तर तो टाकून देणे केव्हाही चांगले. (Photo Pexels)

    हेही पाहा- Navratri 2025: त्रिपुरेश्वरी मंदिरात पंतप्रधान मोदींची देशवासीयांसाठी प्रार्थना; काय आहे या मंदिराचं महत्व? अलीकडेच झालाय जीर्णोद्धार 

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Bottle gourd side effects who should avoid eating dudhi bhopla health tips in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.