-
भारतात विविध संस्कृती आणि पाककृती आहेत. अनेक पदार्थ प्रसिद्धीच्या झोतात आले असले तरी अजूनही बरेच पदार्थ असे असतात की ते अनेकांनी खाल्लेले नसतात. याच अनुषंगाने आज आपण काही उत्तर भारतीय पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत. (Photo Source by Unsplash)
-
बनारसी टोमॅटो चाट : भारतातील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. हा एक चटपटीत आणि मसालेदार पदार्थ असून टोमॅटो, बटाटे, कांदे, पावभाजी मसाला आणि इतर मसाल्यांनी बनवला जातो. गोड, आंबट आणि मसालेदार चटणीसह गरम सर्व्ह केले जातात. हा पदार्थ कुरकुरीत असतो.(Photo Source by Unsplash)
-
भुट्टे का कीस : इंदूरमधील हा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड असून त्यामध्ये ताजे स्वीट कॉर्न किसले जाते आणि नंतर जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांसारख्या मसाल्यांमध्ये शिजवले जाते. ‘भुट्टा’ म्हणजे ‘मका’ आणि ‘कीस’ म्हणजे ‘किसलेले’, त्यामुळे याचा अर्थ ‘किसलेल्या मक्यापासून’ बनवलेला पदार्थ असा होतो. (Photo Source by Unsplash)
-
राजमा गोग्जी : ही एक काश्मिरी डिश आहे. राजमा आणि सलगम यांचा समावेश असलेला हा एक पदार्थ आहे. हा एक खास हिवाळी पदार्थ असून जो जिरे, लवंग, हिंग आणि मसाल्यांसोबत शिजवला जातो. वाफवलेल्या भातासोबत परिपूर्ण आहे.(Photo Source by Unsplash)
-
कचरी की चाट : जंगली खरबूजापासून(कचरी) बनवलेली ही चटणी खायला अतिशय छान लागते. पारंपारिकपणे वाळवंटी प्रदेशात ही जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच पचनास मदत करण्यासाठी म्हणूनही ही खाल्ली जाते.(Photo Source by Unsplash)
-
मद्रा : तूप आणि सुगंधी मसाल्यांसह शिजवलेला दही आधारित चणा करी होय. मद्रा हा हिमाचली उत्सवाचा मुख्य पदार्थ आहे. तो तासन्तास हळूहळू शिजवला जातो जेणेकरून त्याची खास तिखट चव लागेल.(Photo Source by Unsplash)
-
तेहरी : तेहरी हा भाज्या वापरून बनवलेला एक पुलाव किंवा भाताचा प्रकार आहे, जो विशेषतः उत्तर भारतात बनवला जातो. तेहरी हा भाज्या आणि पिवळ्या मसाल्यांनी शिजवलेला एक सुगंधित तांदळाचा पदार्थ आहे. हा उत्तर भारतीय घरांमध्ये दररोजचा आवडता पदार्थ आहे. (Photo Source by Unsplash)
तुम्ही ‘हे’ उत्तर भारतीय पदार्थ आतापर्यंत कधी खाल्ले नाहीत का? मग एकदा नक्की खाऊन पाहा!
उत्तर भारतीय पाककृती म्हणजे केवळ ग्रेव्ही आणि तंदुरी नाही तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे आपण आज काही उत्तर भारतीय पदार्थांबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
Web Title: North indian dish before then definitely try in bhutte ka kees banarasi tamatar chaat gogji razma kachri ki chaat madra tehri gkt