-

Workout Tips : फिटनेस फ्रीक लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासनतास वर्कआउट करतात. पण ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर? यापैकी फिट राहण्यासाठी फायदेशीर काय आहे? जाणून घेऊयात. (Photo: Freepik)
-
धावणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. काही लोक बाहेर किंवा ट्रॅकवर धावणे पसंत करतात, तर काही लोक घरी किंवा जिममध्ये ट्रेडमिलवर धावणे पसंत करतात.(Photo: Freepik)
-
ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर धावणे चांगले? शरीरासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.(Photo: Pexels)
-
ऊर्जा : बाहेर धावण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, परिणामी जास्त कॅलरी बर्न होतात. हे वाऱ्यामुळे होते. जेव्हा आपण बाहेर धावतो तेव्हा वारा शरीराला प्रतिकार करण्यास भाग पाडतो, ज्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागते. ट्रेडमिलवर असे होत नाही. (Photo: Pexels)
-
वेग : ट्रेडमिलवर धावण्याचा वेग थोडा जास्त असतो आणि बाहेर धावणे खूप वेगळे असते. ते थोडे हळू-हळू असते. (Photo: Pexels)
-
सुरक्षितता : ट्रेडमिलवर धावणे हे अधिक सुरक्षित मानले जाते. तथापि, बाहेर धावण्यामुळे दुखापत होऊ शकते, तर रस्त्यातील खडे आणि काटे तुम्हाला टोचू शकतात. (Photo: Pexels)
-
आरोग्य आणि मनोबल : अनेक अभ्यासातून असे आढळून आले आहे की नैसर्गिक वातावरणात व्यायाम केल्याने ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते आणि नैराश्य देखील कमी होते. ट्रेडमिलवर धावल्याने हा अनुभव मिळत नाही. म्हणून बाहेर धावणे अधिक फायदेशीर आहे. (Photo: Pexels)
-
सांधेदुखी : ट्रेडमिलवर धावल्याने तुमच्या सांधे आणि घोट्यांवर शॉकचा परिणाम रोखू शकते, त्यामुळे सांधेदुखी टाळता येते. त्याच वेळी घराबाहेर रस्त्यावर धावण्यामुळे थेट सांध्यावर झटके येतात. ज्यामुळे काही लोकांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. (Photo: Freepik)
-
वजन : अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की बाहेर धावणारे धावपटू ट्रेडमिलवर त्याच वेगाने धावणाऱ्यांपेक्षा ५ टक्के जास्त कॅलरीज बर्न करतात. म्हणूनच, वजन कमी करण्यासाठी बाहेर धावणे अधिक फायदेशीर मानले जाते. (Photo: Pexels)
Workout Tips : ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर? फिट राहण्यासाठी काय आहे फायदेशीर? वाचा!
Workout Tips : फिटनेस फ्रीक लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासनतास वर्कआउट करतात. पण ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर? यापैकी फिट राहण्यासाठी फायदेशीर काय आहे? जाणून घेऊयात.
Web Title: Should you walk on a treadmill or take a morning walk outside what is more beneficial for staying fit read gkt