-

पौष्टिकतेच्या बाबतीत उत्कृष्ट, अँटिऑक्सिडन्ट्सने भरलेले अन्न पेशींचं नुकसान होण्यापासून रोखू शकते आणि कर्करोगाच्या वाढीशी संबंधित हार्मोन्स नियंत्रित करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती देणार आहोत. (PC : Unsplash)
-
ब्रोकोली : सल्फोराफेनने समृद्ध असलेली ब्रोकोली कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते आणि ट्यूमरची वाढ मंदावते. (PC : Unsplash)
-
Fatty fish : सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिनमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं, जे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास आणि जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतं. (PC : Unsplash)
-
बेरी : ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीमध्ये अँथोसायनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात जे पेशींना नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. (PC : Unsplash)
-
जवस : लिग्नान आणि ओमेगा-३ ने भरलेल्या जवसाच्या बिया हार्मोन्स संतुलित करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, जे कर्करोग प्रतिबंधात महत्त्वाचे आहेत. (PC : Unsplash)
-
लसूण : लसणामध्ये अॅलिसिन आणि सल्फर संयुगे असतात जे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार रोखतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात असे दिसून आले आहे. (PC : Unsplash)
-
ग्रीन टी: कॅटेचिनने भरलेला ग्रीन टी ट्यूमरची वाढ रोखू शकते आणि पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवू शकतो. (PC : Unsplash)
‘हे’ सहा पदार्थ स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात!
काही अन्नपदार्थ असे आहेत जे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात, जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध देखील झालं आहे. आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देणार आहोत.
Web Title: 6 foods that can reduce risk of breast cancer iehd import asc