-
नवरात्रोत्सवादरम्यान भाविक नऊ दिवस उपवास करतात.
-
उपवास करताना आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करा.
-
उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश केल्यास लवकर भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते.
-
उपवासाचे पदार्थ दिवसातून ५-६ वेळा अगदी थोड्या प्रमाणात खावेत.
-
जर निर्जळी उपवास करत असाल तर पाणी, लिंबू सरबत, शहाळे आणि ताक याचे सेवन करा.
-
उपवासात दिवसातून २ लिटर द्रव पदार्थ घेतल्यास गरगरणे, चक्कर येणे, तोंडाला कोरड पडणे असे त्रास होत नाहीत.
-
उपवासात तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेल्या गोष्टी खाव्यात.
-
दुपारच्या वेळी काही खावेसे वाटले तर मनुका, खजूर, अक्रोड, बदाम खा.
-
राजगिरा हा उपवासाला चालणारा एक उत्तम पदार्थ आहे. त्यात चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात.
-
उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचे पीठ खा. त्यात ७५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि २० टक्के प्रथिने असतात.
-
खाण्यामध्ये पदार्थांना गोड चव यावी याकरिता साखर वापरण्याऐवजी गूळ किंवा मध वापरा.
-
पूर्ण वेळ उपाशी राहून उपवास केल्याने पित्त वाढते.
-
नवरात्रोत्सवादरम्यान रक्तदाब आणि मधुमेही लोकांनी उपवास करणे टाळावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम आणि Pexels)
Shardiya Navratri 2023 Fasting: नवरात्रीत उपवास करताना ‘अशी’ घ्या काळजी
उपवास करताना आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करा.
Web Title: Shardiya navratri 2023 before fasting upvas read these important health tips photos sdn