-
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला.
-
राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.
-
११,५०० कोटींपैकी १५०० कोटी मदतीसाठी, ३ हजार कोटी पुनर्बांधणीसाठी आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ७ हजार कोटी खर्च होणार आहेत.
-
सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन प्रतिकुटुंब १० हजार रुपये करण्यात आली आहे. यामध्ये ५ हजार कपड्यांच्या नुकसानासाठी आणि ५ हजार भांडी-वस्तूंच्या नुकसानासाठी असतील.
-
पशुधन नुकसान भरपाईमध्ये दुभत्या जनावरांसाठी ४० हजार रुपये प्रतिजनावर, ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी ३० हजार रुपये तर लहान जनावरांसाठी २० हजार रुपये दिले जातील. मेंढरी, बकरी, डुक्करासाठी ४ हजार रुपये दिले जातील. कुक्कुटपालनासाठी प्रतीपक्षी ५० रुपये आणि कमाल ५ हजार रुपये दिले जातील.
-
नष्ट झालेल्या दुकानदारांसाठी ५० हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा १६ हजार दुकानं आणि टपऱ्यांना मदत मिळणार आहे.
-
पूर्ण घर पडलं असल्यास १ लाख ५० हजार रुपये, घराचं ५० टक्के नुकसान झालं असल्यास ५० हजार रुपये आणि २५ टक्के नुकसान झालेल्या घरासाठी २५ टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान १५ हजार रुपयांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले जातील.
-
मत्स्य बोटींच्या अंशत: नुकसानीसाठी १० हजार रुपये तर पूर्ण नुकसान झालेल्या बोटींसाठी २५ हजार रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे जाळ्यांच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपये दिले जातील.
-
हस्तकला कारागिरांना प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये मदत दिली जाईल.
-
सार्वजनिक मालमत्तांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.सार्वजनिक मालमत्तांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
-
मृतांच्या नातेवाईकांना एकूण ९ लाखांची मदत दिली जाईल. यामध्ये एसडीआरएफच्या निकषांनुसार ४ लाख रुपये, मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून १ लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून २ लाख रुपये, तर पंतप्रधानांनी जाहीर केलेले २ लाख रुपये अशी आर्थिक मदत केली जाईल.
पूर्णपणे घर नष्ट झालेल्या लोकांसाठी दीड लाखाची तरतूद आहे. म्हाडाकडून साडेचार लाख रुपये किंमतीची घरं पूरग्रस्तांसाठी उभारली जाणार आहेत. त्यात दीड लाख मदत व पुनर्वसन विभागाकडून तर त्यापेक्षा जास्त लागणार खर्च म्हाडा स्वत: खर्च करून त्या गावाचं पुनर्वसन केलं जाईल. पूर्णपणे घर नष्ट झालेल्या लोकांसाठी दीड लाखाची तरतूद आहे. म्हाडाकडून साडेचार लाख रुपये किंमतीची घरं पूरग्रस्तांसाठी उभारली जाणार आहेत. त्यात दीड लाख मदत व पुनर्वसन विभागाकडून तर त्यापेक्षा जास्त लागणार खर्च म्हाडा स्वत: खर्च करून त्या गावाचं पुनर्वसन केलं जाईल.
पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींचं पॅकेज जाहीर! पण नेमका कसा खर्च होणार हा पैसा? जाणून घ्या!
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या इतर काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे.
Web Title: Maharshtra government announces relief package for flood affected konkan western maharashtra pmw