• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know 10 reasons why covid new omicron variant is cause of concern for indian pbs

Omicron : भारतासाठी ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झालेले रूग्ण बेपत्ता असणं चिंताजनक का? वाचा १० कारणं…

बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण आहे.

December 4, 2021 14:29 IST
Follow Us
  • भारतात पहिला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण आढळल्यानंतर परदेशी प्रवाशांच्या प्रवासाने चिंता वाढवली आहे. त्यातही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या आणि संसर्गाचा अधिक धोका असलेल्या देशांमधून येणारे प्रवासी काळजीचा विषय आहेत. विशेष म्हणजे अशा देशांमधून येऊन बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण आहे. यामागे प्रमुख १० कारणं आहेत त्याचाच हा आढावा. (प्रातिनिधिक छायाचित्र)
    1/11

    भारतात पहिला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण आढळल्यानंतर परदेशी प्रवाशांच्या प्रवासाने चिंता वाढवली आहे. त्यातही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या आणि संसर्गाचा अधिक धोका असलेल्या देशांमधून येणारे प्रवासी काळजीचा विषय आहेत. विशेष म्हणजे अशा देशांमधून येऊन बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण आहे. यामागे प्रमुख १० कारणं आहेत त्याचाच हा आढावा. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 2/11

    १. उत्तर प्रदेशमधील मीरूतमध्ये परदेशातून आलेल्या ३०० पैकी १३ प्रवासी खोटा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊन बेपत्ता झाले आहेत. यातील ७ जण दक्षिण अफ्रिकेतून जाऊन आलेत. तेथूनच ओमायक्रॉन संसर्गाला सुरुवात झालीय. एएनआयने याबाबत वृत्त दिलंय. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 3/11

    २. चंदीगडमध्ये देखील दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या आणि विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका महिला प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही महिला दक्षिण अफ्रिकेतून आल्यावर नियमांचं उल्लंघन करत लगेचच हॉटेलमध्ये गेली होती. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 4/11

    ३. दक्षिण अफ्रिकेतून आलेले १० प्रवासी बंगळुरू विमानतळावरून गायब झालेत. विमानतळ सुरक्षा, पोलीस आणि आरोग्य विभाग त्यांचा शोध घेत आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 5/11

    ४. भारतातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण बंगळुरूमध्ये आढळला. ६६ वर्षीय ही व्यक्ती दक्षिण अफ्रिकेतून आली होती. तिने करोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. या व्यक्तीला घरीच विलगीकरणात राहण्यास सांगितलं होतं. मात्र, ही व्यक्ती पळून गेली. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 6/11

    ५. बंगळुरूमधील ही ६६ वर्षीय व्यक्ती तिचा करोना चाचणीचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेतून निगेटीव्ह अहवाल घेत दुबईला पळून गेलीय. या प्रवाशाचा शोध घेतला जात आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 7/11

    ६. मागील काही दिवसात परदेशातून आलेल्या आणि संशयित असलेल्या १२ प्रवाशांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील ८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. इतर ४ जणांचे अहवाल अद्याप जारी करण्यात आलेले नाही. त्यांचे नमुने ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीसाठी पुढे पाठवण्यात आलेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 8/11

    ७. शुक्रवारी (३ डिसेंबर) चेन्नई विमानतळावर ओमायक्रॉन संसर्गाचा धोका असलेल्या देशामधून आलेल्या दोन प्रवाशांना करोनाचा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालं. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. त्यांचेही नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 9/11

    ८. याशिवाय दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या ४ प्रवाशांसह त्यांच्या घरातील एकूण ९ जण जयपूरमध्ये करोना बाधित निघाले आहेत. ते एक दिवसापूर्वीच दक्षिण अफ्रिकेतून आले होते. या सर्व ९ जणांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 10/11

    ९. भारतात ओमायक्रॉनचे निर्बंध लागण्याआधी संसर्गाचा धोका असलेल्या देशांमधून आलेल्या १८ प्रवाशांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलंय. हे सर्व दिल्ली, मुंबई आणि चंदीगडमधील आहेत. त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आलेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 11/11

    १०. या आठवड्यात भारतात आढळलेला पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण आणि बंगळुरूमधील ४६ वर्षीय डॉक्टर दुबईला फरार झाले आहेत. यानंतर सरकारने नागरिकांना करोना विरोधी लसीचे २ डोस घेत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. (प्रातिनिधिक छायाचित्र)

TOPICS
ओमायक्रॉनOmicronकरोनाCoronaकरोना विषाणूCoronavirusकरोना व्हेरिएंटCorona Variant

Web Title: Know 10 reasons why covid new omicron variant is cause of concern for indian pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.