Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pune protest against nana patole in front of yerwada mental hospital svk 88 scsg

Photos: ‘नाना पटोलेंना दाखल करुन घ्या’ची मागणी करत भाजपाचं येरवडा मेंटल हॉस्पिटलसमोर आंदोलन

पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

Updated: January 19, 2022 12:14 IST
Follow Us
  • protest against nana patole
    1/15

    सोमवारी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

  • 2/15

    ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केलाय. मात्र पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामधील राजकारण चांगलेच तापले आहे.

  • 3/15

    भाजपाने मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

  • 4/15

    मंगळवारी राज्यामधील अनेक शहरांमध्ये नाना पटोलेंच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

  • 5/15

    मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनर्सच्या माध्यमातून पटोलेंचा निषेध केला.

  • 6/15

    काही ठिकाणी पटोलेंच्या फोटोला काळं पासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय.

  • 7/15

    भाजपाच्या मंगळवारच्या या आंदोलनामध्ये महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

  • 8/15

    अनेक ठिकाणी निषेधाचे फलक आणि बॅनर्स झळकावत भाजपा कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात घोषणाबाजी केली.

  • 9/15

    या प्रकरणामध्ये काही शहरांमध्ये पोलिसांकडे पटोलेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

  • 10/15

    या प्रकरणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (१९ जानेवारी २०२२) पुण्यामध्येही पटोलेंविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

  • 11/15

    भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली येरवडा येथील मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

  • 12/15

    पुतळा आणि मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याचं ओळखपत्र बनवून पटोलेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

  • 13/15

    यावेळेस पटोलेंच्या पुतळा तयार करुन त्या पुतळ्याच्या गळ्यामध्ये ‘मी वेडा आहे’ अशी पाटी लावण्यात आलेली.

  • 14/15

    नाना पटोले यांना अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.

  • 15/15

    यावेळी पटोले यांच्या नावाचं रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं एक ओळखपत्रही भाजपाने तयार करुन आंदोलनामध्ये घोषणाबाजी करताना वापरल्याचं पहायला मिळालं. (फोटो सौजन्य: सोशल नेटवर्किंग आणि सागर कासार, लोकसत्ता डॉट कॉम प्रतिनिधीकडून साभार)

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pune protest against nana patole in front of yerwada mental hospital svk 88 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.