• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. eknath shinde maharashtra politics crisis raj thackeray narayan rane leader who quit shivsena till now photos kak

Photos : राणे, राज ठाकरे अन् आता शिंदे… शिवसेनेच्या बंडाळीचा इतिहास

शिवसेनेच्या नेत्यांनी याआधीही बंड पुकारले आहे.

Updated: June 27, 2022 10:55 IST
Follow Us
  • Eknath shinde rebel shivsena
    1/24

    शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 2/24

    शिवसेनेतील ३३ आणि अपक्ष सात आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा नेते एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 3/24

    गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचं बोललं जात आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 4/24

    परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी बंड पुकारल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 5/24

    याआधीही अनेक नेत्यांनी शिवसेनेला असा धक्का दिला आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 6/24

    १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरुद्ध पहिल्यांदा बंड पुकारले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 7/24

    विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भुजबळ यांनी १८ आमदारांसह बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.(फोटो : छगन भुजबळ/ इन्स्टाग्राम)

  • 8/24

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा छगन भुजबळही त्यांच्यासोबत बाहेर पडले.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 9/24

    आता ते राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अन्न पुरवठा मंत्री आहे. (फोटो : छगन भुजबळ/ इन्स्टाग्राम)

  • 10/24

    भुजबळांनंतर नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते गणेश नाईक यांनी बंडाचे निशाण फडकविले. (फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)

  • 11/24

    गणेश नाईक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत लाडके होते.(फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)

  • 12/24

    शिवसेना सोडल्यानंतर नाईकांनी आधी स्वतंत्र संघटना व नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला.आता ते भाजपाचे आमदार आहेत. (फोटो : गणेश नाईक/ इन्स्टाग्राम)

  • 13/24

    बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे दिल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांची लागोपाठ बंड झाली.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 14/24

    राणे यांनी शिवसेनेला उघडपणे आव्हान दिले होते.

  • 15/24

    शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणाऱ्या नारायण राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 16/24

    २०१७ साली त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. २०१८ मध्ये नारायण राणेंनी उघडपणे भाजपाला पाठिंबा दर्शविला. नारायण राणे आता भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 17/24

    शिवसेनेची धुरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी २००५ साली शिवसेनेला रामराम ठोकत नवीन पक्षाची घोषणा केली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 18/24

    राज ठाकरे यांच्या बंडानंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 19/24

    २००६ साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 20/24

    महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणून मनसे कार्यरत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 21/24

    राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर राजसमर्थक असलेले मुलुंडमधील शिशिर शिंदेदेखील पक्षातून बाहेर पडले होते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 22/24

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध पुकारलेले बंड बाळासाहेब गेल्यानंतरचे पहिले आणि मोठे बंड मानले जात आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 23/24

    या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारसोबतच शिवसेनाही मोठ्या संकटात सापडली आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 24/24

    त्यामुळे आता पुढे राज्यात कोणती मोठी राजकीय घडामोड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम) (हेही वाचा : दोन मुलांचा अपघाती मृत्यू आणि राजकारण सोडण्याचा निर्णय; एकनाथ शिंदेंच्या आयुष्यातील हृद्यद्रावक प्रसंग )

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनारायण राणेNarayan Raneमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Eknath shinde maharashtra politics crisis raj thackeray narayan rane leader who quit shivsena till now photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.