Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister maharashtra state eknath shinde mla kopri pachpakhadi vidhansabha satara district fourth cm photos sdn

Photos: पहिले मुख्यमंत्री ते आताची ‘शिंदे’शाही… चौथ्यांदा महाराष्ट्राने स्वीकारलं साताऱ्याचं नेतृत्व

एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नव्हते, ते कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत असा आशावाद गावकऱ्यांना होता.

Updated: July 1, 2022 10:41 IST
Follow Us
  • Maharashtra Chief Minister Eknath Shinde Satara District
    1/30

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते व साताऱ्याचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत.

  • 2/30

    एकनाथ शिंदे दरे तांब (ता महाबळेश्वर) गावचे सामान्य कुटुंबातील सुपुत्र असल्याने सातारकरांना याचा वेगळा अभिमान आहे.

  • 3/30

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.

  • 4/30

    फटाके उडवून, ढोल ताशा वाजवत या छोट्याशा गावात एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

  • 5/30

    दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव आहे.

  • 6/30

    गावातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते.

  • 7/30

    शिंदे मुख्यमंत्री होत असल्याचे वृत्त गावात, महाबळेश्वर,जावळी तालुक्यात धडकताच ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर परिसरात बाल, वृद्ध, महिला, युवक यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला.

  • 8/30

    गावात आज आनंदमय वातावरण आहे.

  • 9/30

    एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नव्हते, ते कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत असा आशावाद गावकऱ्यांना होता.

  • 10/30

    आमच्या गावच्या या पुत्राचा राजकीय प्रवास सुखकर व्हावा यासाठी गावकऱ्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वराला साकडे घातले होते.

  • 11/30

    या गावाच्या लगतची तापोळा, वेळापूर येथील ग्रामस्थही दरे गावात जमा झाले आहेत.

  • 12/30

    टीव्हीवर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाहण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

  • 13/30

    दरेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबुराव शिंदे, तापोळाचे सरपंच आनंद धनावडे, वेळापूरचे सरपंच राम सपकाळ आदींकडे नेतृत्व आहे.

  • 14/30

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्यातील कराडचे यशवंतराव चव्हाण हे सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील होते.

  • 15/30

    त्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे काही महिने मुख्यमंत्री होते.

  • 16/30

    कराडचे राजकीय पार्श्वभूमी असलेले उच्च शिक्षित पृथ्वीराज चव्हाण हे झाले.

  • 17/30

    यांच्यानंतर आता महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांबचे एकनाथ संभाजी शिंदेंच्या नेतृत्वात साताऱ्याने सर्वसामान्य कुटुंबातील चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आहे.

  • 18/30

    साताऱ्याची राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख राहिली आहे.

  • 19/30

    यशवंतराव चव्हाण यामध्ये अग्रभागी होते.

  • 20/30

    त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांचे मूळ गाव कलेढोण (ता. खटाव) असून ते बॅरिस्टर होते.

  • 21/30

    अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर अल्पकाळासाठी भोसले हे मुख्यमंत्री झाले होते.

  • 22/30

    त्यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात कराडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते.

  • 23/30

    त्यांच्यानंतर आता जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत.

  • 24/30

    शिंदे यांचे हे मूळ गाव साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठावर आहे.

  • 25/30

    या गावात त्यांची वडिलोपार्जित शेती, घर, चुलतभाऊ, अन्य नातेवाईक, भाऊबंद या गावात आजही राहतात.

  • 26/30

    गावातील अनेक लोक उद्योग धंद्यानिमित्त मुंबईमध्ये स्थलांतरित झाले.

  • 27/30

    एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय असेच ठाणे येथे स्थलांतरित झाले.

  • 28/30

    मूळ दरे तांबे गावचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.

  • 29/30

    (सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे / ट्विटर)

  • 30/30

    (हेही पाहा : रिक्षावाला ते मुख्यमंत्री… एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्रMaharashtraशिवसेनाShiv SenaसाताराSatara

Web Title: Chief minister maharashtra state eknath shinde mla kopri pachpakhadi vidhansabha satara district fourth cm photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.