-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी विधानसभा अधिवेशनात जोरदार भाषण केलं. यात त्यांनी अनेकांना चिमटे काढले. त्या भाषणातील १२ मुख्य वक्तव्यं…
-
१. राहुल नार्वेकर यांच्याविषयी मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात : अजित पवार
-
२. राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलं मी उमेदवार होईन पण मला अपयश आलं तर मला कुठं तरी सदस्य केलं गेलं पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं : अजित पवार
-
३. एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं. नाहीतर त्यांचं काही खरं नाही : अजित पवार
-
४. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकर यांनी ३ वर्षात करून दाखवलं : अजित पवार
-
५. मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं. म्हटलं काय बडबड करायची ती तिथं बसून करावी. किती तास, किती मिनिटं, किती सेकंद, किती वर्ष सगळं सागू द्यावं : अजित पवार
-
६. मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात.
-
७. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत : अजित पवार
-
८. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर धडाधडा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता : अजित पवार
-
९. गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं : अजित पवार
-
१०. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? : अजित पवार
-
११. चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रिपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? : अजित पवार
-
१२. एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की अजित उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या. तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं : अजित पवार (सर्व फोटो सौजन्य – विधानभवन यूट्यूब व्हिडीओ)
Maharashtra HSC 12th Result Live Updates: पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी; राज्यात बारावीचा निकाल जाहीर