-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना जाहीर आव्हानही दिलं. जाणून घ्या रत्नागिरीमधील पत्रकार परिषदेत त्यांनी केलेली १० मोठी विधानं…
-
“एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल”
-
“ठाणे शहराचा संपर्कप्रमुख असताना मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे”
-
“मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं”
-
“संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत?”
-
“उद्धव ठाकरेंनी शेवटच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांची नावं बदलली हे हिंदुत्वाचं प्रतिक नाही का?”
-
“आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप केले जात आहेत”
-
“उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही”
-
“धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही. आमच्या बापाने केलं आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. तुम्हाला नैतिक अधिकार नाही”
-
“हिंमत असेल तर आम्ही शिवसेना सोडली जाहीर करा”
-
“उद्धव ठाकरेंनी मी आमदार, खासदार कोणावरही जबरदस्ती करणार नाही सांगितलं आहे. मनापासून आहेत त्यांनीच सोबत राहा, चुकत असेल किंवा दुसरीकडे उज्वल भविष्य आहे असं वाटत असेल तर जरुरा जा असं ते म्हणाल आहेत. इतक्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभल्याचा अभिमान आहे”
-
(Photos: Video Screengrab)
“एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं”; विनायक राऊत संतापले; म्हणाले “धनुष्यबाण आमच्या बापाने…”
“मला आज पश्चाताप होत आहे, माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे”
Web Title: Shivsena vinayak raut press conference maharashtra cm eknath shinde uddhav thackeray sgy