• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ramdas kadam on shivsena aditya thackeray ramdas kadam allegations on uddhav thackeray maratha leaders sgy

‘मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न’, ‘मला संपवण्यासाठी रुग्णालयात बैठक’; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; १३ मोठी विधानं

मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?”, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंना विचारणा

Updated: July 27, 2022 17:52 IST
Follow Us
  • उद्धव ठाकरेंची सोबत सोडून शिंदे गटात सहभागी झालेले रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. जाणून घेऊयात त्यांनी केलेली १० मोठी विधानं
    1/15

    उद्धव ठाकरेंची सोबत सोडून शिंदे गटात सहभागी झालेले रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. जाणून घेऊयात त्यांनी केलेली १० मोठी विधानं

  • 2/15

    “मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन”

  • 3/15

    “शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमन होऊन काम करत आहेत”

  • 4/15

    “बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे”

  • 5/15

    “आमदार, खासदार, नगरसेवक का जातात याचं आत्मपरीक्षण करा. शिवसैनिकांना भावनात्मक पद्दतीने ब्लॅकमेल करायचं काम सुरु आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती”

  • 6/15

    “उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे असा मला संशय आहे”

  • 7/15

    “नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो, मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? असा प्रश्न मला पडला आहे”

  • 8/15

    “उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते”

  • 9/15

    “रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात”

  • 10/15

    “तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला नाही तर कोकणातील शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदमला पाडून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?”

  • 11/15

    “मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती, तर मग त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली तेदेखील सांगा”

  • 12/15

    “नवीन शिवसैनिक तुमच्या भावनात्मक गोष्टींमध्ये अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिक वारले, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर ही शिवसेना उभी राहिली”

  • 13/15

    “तुमच्या आदित्यचं योगदान काय? ते आमदार, खासदारांना पाहतदेखील नाहीत. मी प्लास्टिकबंदी केली आणि आपणच केली असं ते सभागृहात सांगत होते”

  • 14/15

    “संजय राऊत नेमके कुणाचे आहेत? ते शिवसेना एकत्र ठेवू शकतील का? पण यातून उद्धव ठाकरेंना बाहेर पडायचं नाही. आता ५० लाख स्टॅम्प पेपर जमवा. सगळ्यांकडून मी पाठीशी उभा आहे लिहून घ्या”

  • 15/15

    (All File Photos)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeरामदास कदमRamdas KadamशिवसेनाShiv Sena

Web Title: Ramdas kadam on shivsena aditya thackeray ramdas kadam allegations on uddhav thackeray maratha leaders sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.