-
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यावर खडाजंगी झाल्याचं पहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत, टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत टोला लगावला.
-
जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंबधी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
-
“मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे चंद्रकांत पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ,” असं जयंत पाटील म्हणाले.
-
“तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही,” असं मिश्किल भाष्य करत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.
-
“हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न आता न्यायालयात आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही तसे करत असाल. मात्र बरेच निर्णय देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसतात. हे सत्य असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात,” असा मिश्किल टोलादेखील जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
-
दरम्यान गुरुवारी सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या ऑफरवर उत्तर देताना, तुम्ही दादांना विचारलं का? असा टोला लगावला.
-
तुम्ही दादांना विचारलं का? विरोधी पक्षनेता तुम्हाला व्हायचं होतं, ते तरी तुम्ही झाले का? कालच्या भाषणातून ते दिसत होतं असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
-
दादांची दादागिरी नेहमी चालणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
-
हलकं फुलकं वातावरण करताना तुम्ही बोचेल असं बोलत होतात अशी खंतही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
-
(Photos: Video Screengrab)
‘आमच्याकडे या, मुख्यमंत्रीपद देऊ’ म्हणणाऱ्या जयंत पाटलांना शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “तुम्हाला तर विरोधी पक्षनेता…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत टोला लगावला
Web Title: Maharashtra assembly session cm eknath shinde on ncp jayant patil offer sgy