• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know what happened between mp navneet rana and amravati police argument and verbal fight rno news pbs

Photos : ‘मला शिकवू नका’ ते ‘फोन रेकॉर्ड करण्याचे आदेश सरकारने दिले का?’; अमरावतीत नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये काय घडलं? वाचा…

अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं.

September 7, 2022 21:34 IST
Follow Us
  • अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं.
    1/21

    अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं.

  • 2/21

    नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर त्यांचा फोन रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप केला.

  • 3/21

    तसेच तुम्हाला तुम्हाला फोन रेकॉर्ड करण्याची परवानगी कोणी दिली असा सवाल करत हुज्जत घातली.

  • 4/21

    खासदार नवनीत राणा यांनी आपला फोन कॉल रेकॉर्डिंग केल्याबाबत पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना जाब विचारला.

  • 5/21

    अमरावतीमध्ये मंगळवारी (६ सप्टेंबर) पालकांनी त्यांच्या एका १९ वर्षीय युवतींच्या अपहरण केल्याचा आरोप केला होता.

  • 6/21

    या प्रकरणामध्ये सोहेल शहा नावाच्या युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आहे.

  • 7/21

    या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला.

  • 8/21

    यावेळी आरोपीला कडक पद्धतीने विचारा असं बोलले असता मनीष ठाकरेंनी माझा कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.

  • 9/21

    याच मुद्द्यावर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी वाद केला.

  • 10/21

    “मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला,” असा आरोप करत राणांनी ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला.

  • 11/21

    त्यावेळी पोलीस व नवनीत राणा यांच्यामध्ये वाद होऊन तणावपूर्ण वातावरण तयार झालं.

  • 12/21

    या वादात राणांनी ‘डीसीपी साहेब तुम्ही मला शिकवू नका’ असं वक्तव्य केलं.

  • 13/21

    “सगळ्यांचे फोन रेकॉर्ड करण्याची तुम्हाला परवानगी आहे का?” असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला.

  • 14/21

    राणा पोलिसांना म्हणाल्या, “आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर जाणार नाही, पोलीस आयुक्तांना बोलवा.”

  • 15/21

    “तुमची किती ताकद आहे? मला पोलीस स्टेशनमधून हलवून दाखवा,” असं आव्हान राणांनी पोलिसांना दिलं.

  • 16/21

    “तुम्ही फोन रेकॉर्ड करू शकता का?” असा प्रश्न नवनीत राणांनी विचारला.

  • 17/21

    तुम्हाला सरकारने आमचे रेकॉर्ड करण्याचे आदेश दिले आहेत का? असाही सवाल राणांनी केला.

  • 18/21

    गेल्या १० दिवसातील ही पाचवी घटना असल्याचा आणि पोलीस तातडीने कारवाई करत नसल्याचा आरोप नवनीत राणांनी केला.

  • 19/21

    दरम्यान नवनीत राणा यांनी पीडित मुलीच्या आईला आपल्यासोबत घरी नेले.

  • 20/21

    तसेच दोन तासांमध्ये मुलीला आणावे असा पोलिसांना अल्टीमेटम दिला.

  • 21/21

    नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमधील वाद (सर्व फोटो सौजन्य – आरएनओ)

TOPICS
अमरावतीAmravatiनवनीत राणाNavneet RanaपोलीसPolice

Web Title: Know what happened between mp navneet rana and amravati police argument and verbal fight rno news pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.