• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is rutuja latke uddhav thackeray shivsena andheri bypoll election candidate photos kak

Photos : आमदार पतीचा मृत्यू, BMCची नोकरी, ठाकरे विरुद्ध शिंदे वादाच्या केंद्रस्थानी ते राजीनामानाट्य… ऋतुजा लटके आहेत तरी कोण?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या ऋतुजा लटके यांच्याबद्दल जाणून घेऊया.

October 13, 2022 17:45 IST
Follow Us
  • who is rutuja latke
    1/15

    राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 2/15

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 3/15

    परंतु, मुंबई महापालिकेने राजीनामा न स्वीकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • 4/15

    याबाबत निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला तातडीने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.

  • 5/15

    अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या ऋतुजा लटके यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  • 6/15

    ऋतुजा लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. मे महिन्यात रमेश लटके यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झालं. त्यांना दोन मुले आहेत.

  • 7/15

    रमेश लटके हे अंधेरी पूर्व भागातून दोन वेळा आमदार म्हणून निवडूण आले होते. त्याआधी ते नगरसेवकही होते.

  • 8/15

    आता त्यांच्या जागेवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 9/15

    ऋतुजा या मुंबई महापालिकेत कारकून(क्लर्क) आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून त्या महापालिकेत नोकरी करत आहेत.

  • 10/15

    करोना महामारीच्या काळातही त्यांनी सेवा बजावली होती. ऋतुजा लटके या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या.

  • 11/15

    ऋतुजा लटके या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

  • 12/15

    ऋतुजा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत “आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असू”, असं म्हणाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

  • 13/15

    “शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, निशाणी – मशाल”, असं कॅप्शन देत ऋतुजा यांनी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नवीन चिन्हाचा लोगोही पोस्ट केला आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : ऋतुजा लटके/ फेसबुक)

  • 15/15

    (हेही पाहा >> गद्दार, बंडखोरी, तुरुंगवास ते वीर सावरकर आणि टिळक; संजय राऊतांनी आईला लिहिलेल्या पत्राची चर्चा)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeट्रेंडिंग न्यूजTrending NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Who is rutuja latke uddhav thackeray shivsena andheri bypoll election candidate photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.