• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aaditya thackeray answer bjp mla nitesh rane over bihar visit criticism pbs

Photos : राम मंदिराचा रथ अडवणाऱ्याच्या मुलाला भेटणार का? भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राम मंदिराचा रथ अडवणाऱ्याच्या मुलाला भेटणार का? या भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर दिलंय.

Updated: November 23, 2022 18:15 IST
Follow Us
  • युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर गेले.
    1/18

    युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर गेले.

  • 2/18

    यावरून भाजपाचे आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.

  • 3/18

    ज्या लालू प्रसाद यांनी राम मंदिरासाठी निघालेला रथ अडवला त्यांच्या मुलाला बाळासाहेब ठाकरेंचा नातू जाऊन बेटणार आहे, असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं.

  • 4/18

    तसेच यालाच बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व म्हणतात का? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.

  • 5/18

    मुंबईतून बिहारला जाण्याआधी माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी नितेश राणेंच्या टीकेवर आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला.

  • 6/18

    यावर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

  • 7/18

    ज्यांनी पीडीपीसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

  • 8/18

    तसेच इतर राज्यांमध्ये टीकाकारांसोबत युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असंही नमूद केलं.

  • 9/18

    आदित्य ठाकरेंनी बिहार दौऱ्याविषयीही भूमिका स्पष्ट केली. त्याच्या भूमिकेतील महत्त्वाची विधानं खालीलप्रमाणे…

  • 10/18

    मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा सुरू आहे – आदित्य ठाकरे

  • 11/18

    आधी आमचं महाराष्ट्रात सरकार होतं आणि ते बिहारमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करत असतो – आदित्य ठाकरे

  • 12/18
  • 13/18

    आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणून ही बैठक रद्द करण्यात आली – आदित्य ठाकरे

  • 14/18

    राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळाकडे महाराष्ट्रातील प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी एक तासही नाही – आदित्य ठाकरे

  • 15/18

    हे सर्व गुजरातमध्ये निवडणुकीत व्यग्र आहेत. आधी यांनी गुजरातमध्ये आमदार पाठवले, नंतर प्रकल्प पाठवले आणि आता मंत्रिमंडळ पाठवलं आहे – आदित्य ठाकरे

  • 16/18

    त्यांनी दुसऱ्या राज्यात प्रचार करावा. त्याबद्दल आक्षेप नाही, मात्र, महाराष्ट्रात ओला दुष्काळ आणि इतर संकटं असताना मंत्रिमंडळ बैठक होणं गरजेचं होतं – आदित्य ठाकरे

  • 17/18

    त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक तास द्यायला हवा होता – आदित्य ठाकरे

  • 18/18

    सर्व छायाचित्र – संग्रहित छायाचित्र

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayनितेश राणेNitesh RaneबिहारBiharभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Aaditya thackeray answer bjp mla nitesh rane over bihar visit criticism pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.