• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena leader sushma andhare say i like devendra fadnavis criticizing raj thackeray pbs

Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांच्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमध्ये झालेल्या महाप्रबोधन यात्रेच्या सभेतील भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे…

December 2, 2022 19:04 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला आहे.
    1/18

    शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला आहे.

  • 2/18

    “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी त्यांच्या एका विधानावर निशाणा साधला.

  • 3/18

    तसेच मनसेला ‘मतदार नसलेली सेना’ म्हणत टोला लगावला.

  • 4/18

    त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.

  • 5/18

    सुषमा अंधारे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाल्या याचा हा आढावा…

  • 6/18

    खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही – सुषमा अंधारे

  • 7/18

    आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं – सुषमा अंधारे

  • 8/18

    फडणवीस म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा – सुषमा अंधारे

  • 9/18

    मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही – सुषमा अंधारे

  • 10/18

    मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही – सुषमा अंधारे

  • 11/18

    आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे – सुषमा अंधारे

  • 12/18

    अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं – सुषमा अंधारे

  • 13/18

    आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो – सुषमा अंधारे

  • 14/18

    ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात – सुषमा अंधारे

  • 15/18

    दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना – सुषमा अंधारे

  • 16/18

    मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं – सुषमा अंधारे

  • 17/18

    यावेळी सुषमा अंधारेंनी दोन शहाण्या वाघांची गोष्टही सांगितली.

  • 18/18

    तसेच शहाणा वाघ दोन वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा होऊ देत नाही, असं वक्तव्य केलं. (सर्व छायाचित्र – संग्रहित/ट्विटर)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमनसेMNSराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Senaसुषमा अंधारेSushma Andhare

Web Title: Shivsena leader sushma andhare say i like devendra fadnavis criticizing raj thackeray pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.