-
“थोर पुरुषांनी आपलं आयुष्य लोकांसाठी वेचलं. लोकांचं कल्याण व्हावं हाच त्यांचा ध्यास होता. असं असूनही वारंवार त्यांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे.” साताऱ्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजेंनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.(सर्व फोटो- संग्रहित)
-
उदयनराजे म्हणाले, “चित्रपट असेल किंवा जाहीरपणे केली जाणारी वक्तव्यं असतील. का कुणास ठाऊक, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. ”
-
“लोकांनी फारसा विचार करणं बंद केलंय असं माझं ठाम मत आहे.”
-
“प्रत्येकाचं जीवन व्यग्र झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर पडताना पाहायला मिळत आहे. हे एका दिवसात झालेलं नाही.”
-
“शिवाजी महाराजांना वाटलं असतं की राजेशाही अस्तित्वात ठेवावी, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती.”
-
“त्याकाळी जगात एकमेव शिवाजी महाराज होते की त्यांना वाटलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असायला हवा. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली.”
-
“आज जर आपण स्वत:ला सावरलं नाही, तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.”
-
“ महाराष्ट्रातही विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील.”
-
“यावरून चाललेल्या राजकारणाला मी फारसं महत्त्व देत नाही.”
PHOTOS : “… तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही” – उदयनराजेंचं विधान!
“आज राजेशाही असती तर ही वेळ आली नसती”, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
Web Title: Photos then it will not take long to break this country into 29 pieces udayanraje bhosle statement msr