• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ncp rupali thombare answer serious allegations of mp rahul shewale mention devendra fadnavis pbs

“राहुल शेवाळेंचे दुबईतील महिलेशी विवाहबाह्य संबंध कसे?”, रुपाली ठोंबरेंचा सवाल, म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांनी…”

बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला राष्ट्रवादीच्या नेत्याने फुस लावल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळेंनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

Updated: December 26, 2022 13:58 IST
Follow Us
  • शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला.
    1/24

    शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला.

  • 2/24

    तसेच तक्रारदार महिलेला फुस लावली जात आहे, असाही दावा शेवाळेंनी केला. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

  • 3/24

    त्या रविवारी (२५ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या. त्या नेमक्या काय म्हणाल्या याचा हा आढावा…

  • 4/24

    पीडित मुलगी दुबईत राहत होती. तेथे राहुल शेवाळेंनी स्वतःचा पॉवर-पैसा वापरला – रुपाली ठोंबरे पाटील

  • 5/24

    ती मुलगी माझ्याशी लग्न कर म्हणत होती आणि त्यावरून वाद झाला. यानंतर तिने राहुल शेवाळेंचा तो व्हिडीओ जारी केला – रुपाली ठोंबरे पाटील

  • 6/24

    व्हिडीओ जारी केल्यामुळे शेवाळेंनी त्या मुलीला एका प्रकरणात अडकवलं. तो खटला चालला आणि या प्रकरणी ती मुलगी ७८ दिवस तुरुंगात होती. त्यानंतर ती तुरुंगाबाहेर आली – रुपाली ठोंबरे पाटील

  • 7/24

    दुबईचे काही कायदे आहेत. त्यानुसार दुबईत येऊन असे प्रकार केल्याने त्यांनी तिला दुबईत येण्यास नकार दिला. त्यात विशेष काही नाही. तो कायदा आहे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 8/24

    राहुल शेवाळेंचे दुबईत असणाऱ्या महिलेशी संबंध कसे आले? ते स्वतःला सांसारिक समजता, त्यांचं लग्न झालं आहे, मुलंबाळं आहेत. त्यांचा पाय कसा घसरला? – रुपाली ठोंबरे पाटील

  • 9/24

    ते त्यांच्या विवाहबाह्य संबंधाचा खुशाल दाऊदशी संबंध लावतात. लाज वाटते. लोक म्हणत असतील हे खासदार आहेत की कोण आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

  • 10/24

    याची चौकशी झालीच पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना विनंती करते की, राहुल शेवाळेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 11/24

    ती मुलगी गुन्हेगार नाही. ते सिद्ध झालेलं नाही. ती आरोपी आहे. शेवाळे खासदार आहेत, संसदेत प्रतिनिधित्व करतात, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 12/24

    शेवाळेंशी विवाहबाह्य संबंध असलेली महिला लग्न करण्यासाठी मागे लागते. त्यानंतर त्यांनी तिला आपल्या पॉवरचा उपयोग करून एका रॅकेटमध्ये अडकवलं गेलं – रुपाली ठोंबरे पाटील

  • 13/24

    आता पीडित महिलेचा दाऊदशी संबंध असल्याचं सांगत आहेत. हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 14/24

    राहुल शेवाळेंचं म्हणणं आहे की, त्या तरुणीचा दाऊदशी संबंध आहे, तर मग १९९३ च्या बॉम्बस्फोटात या मुलीचा हात नसेल ना? असू शकतो कारण खासदार सांगतात – रुपाली ठोंबरे पाटील

  • 15/24

    त्या मुलीचा जन्म १९८९ चा आहे. म्हणजे ती मुलगी ३-४ वर्षांची असताना तिचा दाऊदबरोबर बॉम्बस्फोटात सहभाग असू शकतो. कारण खासदार सांगत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

  • 16/24

    अरे लाजा वाटल्या पाहिजे. ते लोकप्रतिनिधी आहेत आणि विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी दाऊदशी संबंध असल्याचं म्हणतात – रुपाली ठोंबरे पाटील

  • 17/24

    त्या मुलीचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करतात, पण त्या मुलीशी राहुल शेवाळेंचे विवाहबाह्य संबंध होते – रुपाली ठोंबरे पाटील

  • 18/24

    मग त्यांनी देशाची गोपनीय माहिती त्या मुलीला दिली का? त्यांना लाज वाटली पाहिजे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 19/24

    माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यात तिने पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला काय रिपोर्ट दिला याचे पुरावे आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

  • 20/24

    शेवाळेंनी तिच्यावर कलम १५६ प्रमाणे केस दाखल केली. त्याचेही सर्व जबाब आणि कागदपत्रे आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

  • 21/24

    हे प्रकरण म्हणजे राहुल शेवाळेंचे विवाहबाह्य संबंध, त्या महिलेचं केलेलं शोषण, तिला जीवे मारण्याची धमकी देणे असं आहे – रुपाली ठोंबरे पाटील

  • 22/24

    आता ते भाजपाबरोबर आहेत, म्हणून एनआयए आणि दाऊद असा उल्लेख करत असतील, तर त्यांची पात्रता आणि बुद्धी कळली – रुपाली ठोंबरे पाटील

  • 23/24

    राहुल शेवाळेंनी त्या महिलेसोबत दुबईत मजा केली आणि आता ते विवाहबाह्य संबंधावरून लक्ष हटवण्यासाठी दाऊदशी संबंधाचा आरोप करत आहेत, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.

  • 24/24

    हेही वाचा – “खासदार राहुल शेवाळेंनी वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता…”, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisबलात्कारRapeभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Ncp rupali thombare answer serious allegations of mp rahul shewale mention devendra fadnavis pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.