Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prithviraj chavan important statements about congress rebel sudhir tambe satyajeet tambe pbs

Photos : काँग्रेससमोर मोठा पेच, काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं गटनेतेपद बंडखोर सुधीर तांबेंकडे, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१६ जानेवारी) काँग्रेसमधील बंडखोरीवर केलेल्या महत्त्वाच्या विधानांचा हा आढावा…

Updated: January 19, 2023 10:14 IST
Follow Us
  • काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
    1/25

    काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • 2/25

    यानंतर काँग्रेसने सुधीर तांबेंचं निलंबन केलं. आता सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 3/25

    अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१६ जानेवारी) एबीपी माझाशी बोलताना याबाबत महत्त्वाची विधानं केली. त्याचा हा आढावा…

  • 4/25

    आजही सुधीर तांबेंच्या आमदारकीची मुदत शिल्लक आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 5/25

    ते ६ फेब्रुवारीपर्यंत विधान परिषदेचे सदस्य आहेत – पृथ्वीराज चव्हाण

  • 6/25

    परंतु तोपर्यंत ते काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेतेही आहेत – पृथ्वीराज चव्हाण

  • 7/25

    त्यामुळे त्यांना गटनेतेपदावरून निलंबित करून त्यांच्या जागेवर दुसरा नेता नेमला का याची मला माहिती नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 8/25

    मात्र, तसा दुसरा नेता नेमावा लागेल. कारण काही दिवसांपूर्वीच सुधीर तांबेंना विधान परिषदेत काँग्रेस गटनेता केलं होतं – पृथ्वीराज चव्हाण

  • 9/25

    सुधीर तांबेंना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे या शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी संबंधित आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 10/25

    महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीला काही शिफारस करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय एआयसीसीच करेल – पृथ्वीराज चव्हाण

  • 11/25

    सुधीर तांबे यांच्या निलंबनाचा निर्णयही केंद्रीय शिस्तपालन समितीने घेतला होता – पृथ्वीराज चव्हाण

  • 12/25

    त्या समितीचे सचिव तारिक अन्वर आहेत. त्यांच्या सहीने सुधीर तांबेंच्या निलंबनाचं पत्र निघालं आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 13/25

    त्यामुळे आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर त्यांच्या सहीनेच होईल – पृथ्वीराज चव्हाण

  • 14/25

    सत्यजीत तांबेंच्या निलंबनाची माहिती महाराष्ट्रातून मिळणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 15/25

    शिफारस महाराष्ट्रातून नक्की जाईल, मात्र निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पातळीवर होईल – पृथ्वीराज चव्हाण

  • 16/25

    सुधीर तांबेंचं निलंबन झालं आहे. आता त्यापुढे काय कारवाई करायची हा निर्णय तारिक अन्वर घेतील – पृथ्वीराज चव्हाण

  • 17/25

    शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले होते – पृथ्वीराज चव्हाण

  • 18/25

    त्यातील एकाला आशीर्वाद द्यावा लागेल, अधिकृत मान्यता देऊन पाठिंबा द्यावा लागेल – पृथ्वीराज चव्हाण

  • 19/25

    ती प्रक्रिया आता चालू आहे. अर्धा तासात त्याचा निर्णय होईल. याशिवाय नाशिक आणि नागपूरची काही सांगड घालायची का? हाही काही लोकांचा प्रयत्न आहे. काही वेळातच हे चित्र स्पष्ट होईल – पृथ्वीराज चव्हाण

  • 20/25

    प्रश्न सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाचा नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 21/25

    निर्माण झालेल्या या परिस्थितीत काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या सर्व घटकपक्षांनी यातून काय मार्ग काढायचा असा आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 22/25

    कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपाच्या विचाराच्या लोकांच्या हातात ही जागा जाऊ नये – पृथ्वीराज चव्हाण

  • 23/25

    मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला सर्वांना समर्थन करावं, अशाप्रकारची चर्चा सुरू आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 24/25

    काही लोकांना त्यात नागपूरचा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे नागपूर, नाशिक यांची एकत्रित चर्चा होऊन मार्ग निघेल – पृथ्वीराज चव्हाण

  • 25/25

    तसेच कोण अर्ज मागे घेत आहे आणि कोण नाही हे अर्धा तासात आपल्याला कळेल – पृथ्वीराज चव्हाण (सर्व फोटो संग्रहित)

TOPICS
काँग्रेसCongressनाशिकNashikनाशिक न्यूजNashik Newsपृथ्वीराज चव्हाणPrithviraj Chavanभारतीय जनता पार्टीBJPसत्यजीत तांबेSatyajeet Tambe

Web Title: Prithviraj chavan important statements about congress rebel sudhir tambe satyajeet tambe pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.