• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important statements of dcm devendra fadnavis on shivsena uddhav thackeray eknath shinde in front of pm narendra modi pbs

Photos : शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानी ते एकनाथ शिंदेंची हिंमत, मोदींसमोरील फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पंतप्रधान मोदींसमोर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानीपासून एकनाथ शिंदेंच्या हिमतीपर्यंत अनेक महत्त्वाची विधानं केली. याचा हा आढावा…

Updated: January 19, 2023 19:01 IST
Follow Us
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पंतप्रधान मोदींसमोर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानीपासून एकनाथ शिंदेंच्या हिमतीपर्यंत अनेक महत्त्वाची विधानं केली. याचा हा आढावा...
    1/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुंबईत आले.

  • 2/27

    यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पंतप्रधान मोदींसमोर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानीपासून एकनाथ शिंदेंच्या हिमतीपर्यंत अनेक महत्त्वाची विधानं केली.

  • 3/27

    देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेतील बंडखोरी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

  • 4/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे – देवेंद्र फडणवीस

  • 5/27

    २०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं.तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केलं – देवेंद्र फडणवीस

  • 6/27

    मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं – देवेंद्र फडणवीस

  • 7/27

    मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही – देवेंद्र फडणवीस

  • 8/27

    मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं – देवेंद्र फडणवीस

  • 9/27

    यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वेगाने धावू लागला – देवेंद्र फडणवीस

  • 10/27

    आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे – देवेंद्र फडणवीस

  • 11/27

    करोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली – देवेंद्र फडणवीस

  • 12/27

    मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला – देवेंद्र फडणवीस

  • 13/27

    असं असलं तरी आमचं पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला – देवेंद्र फडणवीस

  • 14/27

    आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे – देवेंद्र फडणवीस

  • 15/27

    मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं – देवेंद्र फडणवीस

  • 16/27

    आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे – देवेंद्र फडणवीस

  • 17/27

    त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे – देवेंद्र फडणवीस

  • 18/27

    मुंबईत कोट्यावधी लिटर प्रदुषित पाणी प्रक्रिया न करता रोज समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळेच समुद्र घाण होत होता – देवेंद्र फडणवीस

  • 19/27

    २०-२५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केले. स्वतःची घरं भरली – देवेंद्र फडणवीस

  • 20/27

    मात्र, एवढे वर्षे सत्तेत असूनही त्यांनी मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही – देवेंद्र फडणवीस

  • 21/27

    मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी बीएमसीला सांगितलं की, हे पाणी असं समुद्रात सोडता येणार नाही – देवेंद्र फडणवीस

  • 22/27

    मुंबईत उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करावे लागतील, असं मी बीएमसीला सांगितलं – देवेंद्र फडणवीस

  • 23/27

    यानंतर बीएमसीने सांडपाणी प्रक्रियेबाबत नियम आणि निकषच नसल्याचं सांगितलं – देवेंद्र फडणवीस

  • 24/27

    याबाबत मी मोदी सरकारकडे याबाबत नियमावली तयार करण्याची विनंती केली. मोदी सरकारने एक वर्षात ती नियमावली तयार केली – देवेंद्र फडणवीस

  • 25/27

    नियम तयार केल्यानंतरही बीएमसीला तीन वर्षे सांडपाण्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करता आली नाही. कारण सत्तेवर असणाऱ्या त्यांचा हिस्सा मिळत नव्हता – देवेंद्र फडणवीस

  • 26/27

    मात्र, आमचं सरकार आल्यावर आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात या कामाला गती दिली. आज त्याच प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते होत आहे – देवेंद्र फडणवीस

  • 27/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य – युट्यूब लाईव्ह)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Important statements of dcm devendra fadnavis on shivsena uddhav thackeray eknath shinde in front of pm narendra modi pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.