• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. satyajeet tambe say i was ready to apologies to congress delhi leaders about nashik election pbs

“दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल, मी म्हटलं…”, सत्यजीत तांबेंचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमके काय गौप्यस्फोट केलेत याचा हा आढावा…

Updated: February 4, 2023 19:46 IST
Follow Us
  • नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
    1/24

    नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/24

    सत्यजीत तांबेंनी शनिवारी (४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय गौप्यस्फोट केलेत याचा हा आढावा…

  • 3/24

    माझी प्रामाणिक इच्छा होती की, मला महाविकासआघाडीने तातडीने पाठिंबा द्यावा – सत्यजीत तांबे

  • 4/24

    आम्ही दिल्लीशी संपर्कात होतो – सत्यजीत तांबे

  • 5/24

    मला दिल्लीतून सांगण्यात आलं की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा – सत्यजीत तांबे

  • 6/24

    मी पत्र लिहिलं आणि पाठवलं. त्यांनी पत्रात हा शब्द समाविष्ट करा, तो समाविष्ट करा सांगितलं. आमचा पूर्ण एक दिवस ते पत्र अंतिम करण्यात गेला – सत्यजीत तांबे

  • 7/24

    दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल – सत्यजीत तांबे

  • 8/24

    मी म्हटलं, माझी काहीच चूक झालेली नाही – सत्यजीत तांबे

  • 9/24

    ते म्हटले, तरीही माफी मागावी लागेल – सत्यजीत तांबे

  • 10/24

    मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हटलं, मी जाहीर माफीही मागेन, काही हरकत नाही – सत्यजीत तांबे

  • 11/24

    कारण ज्या पक्षात मी आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून भूमिका घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी माफी मागायलाही तयार झालो – सत्यजीत तांबे

  • 12/24

    याबाबत मी एच. के. पाटील यांना माझ्या स्वाक्षरीनिशी एक पत्र लिहिलं – सत्यजीत तांबे

  • 13/24

    हे पत्र मी त्यांना १९ जानेवारीला पाठवलं. म्हणजे १७,१८,१९ असे तीन दिवस आम्ही बोलत होतो – सत्यजीत तांबे

  • 14/24

    माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही बोलणं झालं होतं – सत्यजीत तांबे

  • 15/24

    १६ की १७ जानेवारीला मी स्वतः नाना पटोलेंना फोनही केला होता. तसेच तुम्ही ही भूमिका सोडून द्या आणि मला पाठिंबा द्या, अशी मागणी केली – सत्यजीत तांबे

  • 16/24

    मी काँग्रेसचा आहे, असंही मी सांगितलं – सत्यजीत तांबे

  • 17/24

    माझ्याकडे संजय राऊतांना पाठवलेले मेसेजही आहेत – सत्यजीत तांबे

  • 18/24

    मी मविआच्या पाठिंब्याची प्रामाणिक अपेक्षा केली – सत्यजीत तांबे

  • 19/24

    एकीकडे मी दिल्लीच्या नेत्यांशी बोलतो आहे. दिल्लीतील नेते माझ्याकडून लेखी पत्र मागत आहेत – सत्यजीत तांबे

  • 20/24

    दिल्लीवाले मला माफी मागायला सांगत आहेत. मी तेही करायला तयार होतो – सत्यजीत तांबे

  • 21/24

    दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आम्ही अमूक उमेदवाराला पाठिंबा देणार, सत्यजीत तांबेंनी आम्हाला फसवलं, तांबेंनी धोका दिला, असं बोलत होते – सत्यजीत तांबे

  • 22/24

    ज्या लोकांना सुधीर तांबे आणि थोरात-तांबे कुटुंब माहिती आहेत ते कधीच यावर विश्वास ठेवणार नाही की, हा परिवार कधी कुणाला फसवू शकतो – सत्यजीत तांबे

  • 23/24

    असं असताना आमच्यावर वारंवार फसवल्याचे, धोका दिल्याचे, अंधारात ठेवल्याचे आरोप करण्यात आले – सत्यजीत तांबे

  • 24/24

    मी माफीचं पत्र दिलं त्यानंतर दोन तासांनी मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला – सत्यजीत तांबे

TOPICS
काँग्रेसCongressनाशिकNashikनाशिक न्यूजNashik Newsनिवडणूक २०२४Electionसत्यजीत तांबेSatyajeet Tambe

Web Title: Satyajeet tambe say i was ready to apologies to congress delhi leaders about nashik election pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.