• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chhagan bhujbal said satyajeet tambe will not return to congress party prd

सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार का? छगन भुजबळ म्हणाले, “तांबे ज्या पद्धतीने…”

मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

February 5, 2023 15:41 IST
Follow Us
  • nana patole, satyajeet tambe
    1/18

    अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/18

    विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. तांबे कुटुंबीय तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी कट रचला गेला.

  • 3/18

    मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

  • 4/18

    तांबे यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस पक्षातील याच अंतर्गत वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

  • 5/18

    शरद पवार यांनी निवडणुकीपुर्वीच नाशिकच्या जागेवरील तिढा काँग्रेसने मिटवावा असे सूचलवे होते, असे भुजबळ म्हणाले आहेत.

  • 6/18

    काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं, हे समजायला मार्ग नाही. अगदी ऐनवेळी जे झाले ते फारच विचित्र झाले. यामध्ये कोण दोषी याचा अद्याप उलगडा झालेला नाही.- छगन भुजबळ

  • 7/18

    शरद पवार यांनी निवडणुकीच्या अगोदच फॉर्म भरताना सांगितले होते की काँग्रेसने या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे. काँग्रेसने एकत्र बसून हा प्रश्न सोडवला पाहिजे.- छगन भुजबळ

  • 8/18

    मात्र हा प्रश्न त्यावेळी सुटला नाही. मग साहजिकच निवडणूक बिनविरोध होते की काय असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मग महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उभे केले.- छगन भुजबळ

  • 9/18

    वेळ फार कमी होता. मात्र शुभांगी पाटील यांनी ४० हजार मतं मिळवली- छगन भुजबळ

  • 10/18

    तांबे यांनी मतदारनोंदणी मोठ्या प्रमाणात केली. ते आता निवडून आले आहेत. ते अजूनही सांगत आहेत की मी अपक्ष आहे.- छगन भुजबळ

  • 11/18

    काँग्रेसने मला चुकीचे एबी फॉर्म दिले होते, असे ते सांगतात. मी ५६ ते ५७ वर्षे राजकारणात आहे. मी अनेक निवडणुका लढवल्या.- छगन भुजबळ

  • 12/18

    पण अशा प्रकारे कोणी एबी फॉर्म देतं आणि ते घेताना कोणीही पाहात नाही, असं कधी होत नाही. मतदारसंघ कोणता आहे.- छगन भुजबळ

  • 13/18

    नाव बरोबर आहे का? या सर्व बाबी तपासल्या जातात. मात्र सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत नेमके काय घडले? यावरच वाद-प्रतिवाद सुरू आहे. काँग्रेसने काय ते पाहावे. त्यात लवकरच स्पष्टता येईल- छगन भुजबळ

  • 14/18

    सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर ते काँग्रेसवर टीका करणारच. नाना पटोलेंवर जे आरोप झाले, त्याला ते (नाना पटोले) उत्तर देतीलच.- छगन भुजबळ

  • 15/18

    काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोललं पाहिजे. यामध्ये नेमकं काय घडलं? हे फक्त बाळासाहेब थोरात सांगू शकतात.- छगन भुजबळ

  • 16/18

    सत्यजीत तांबे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परण्याचा हेतू आहे, असे मला वाटत नाही- छगन भुजबळ

  • 17/18

    छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या कसबा, चिंचवड या पोटनिवडणुकीवरही भाष्य केले.- छगन भुजबळ

  • 18/18

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मात्र आमचे नेते एकत्र बसतील आणि मग ही निवडणूक बिनविरोध करायची की नाही ते ठरवतील. आमचे शीर्षस्थ नेते यावर निर्णय घेतील. यावर चर्चा झालेली आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल- छगन भुजबळ

TOPICS
काँग्रेसCongressछगन भुजबळChhagan Bhujbalनाना पटोलेNana Patoleसत्यजीत तांबेSatyajeet Tambe

Web Title: Chhagan bhujbal said satyajeet tambe will not return to congress party prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.