-
काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. यावरून आज नरेंद्र मोदींनी ( ८ फेब्रुवारी ) अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.
-
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काल काहीजण उड्या मारत होते. त्यांना काल झोपही चांगली आली असेल, आज उठलेही नसतील.”
-
“राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी काहीजणांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या नेत्यांने राष्ट्रपतींचा अपमानाही केला.”
-
“अशा लोकांना म्हटलं जात की, यह कह कह कर हम दिल बेहला रहे है की, ओ अब चल चुके हैं, वो अब आ रहे है,” असा टोला पंतप्रधानांनी राहुल गांधींना लगावला आहे.
-
“देशातील १४० कोटी लोकांचं आयुष्य सामर्थ्यानं भरलेलं आहे. देशातील तीन दशके अस्थिरतेची होती.”
-
“देशात सध्या स्थिर सरकार आहे. डिजिटल भारताचं सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. एक वेळ होती, टेक्नोलॉजीसाठी भारत तरसत होता. पण, इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सुधार करत आहोत. कारण आताचे सरकार राष्ट्रहितासाठी निर्णय घेणार आहे,” असं पंतप्रधानांनी सांगितलं.
-
विरोधकांना लक्ष्य करत पंतप्रधानांनी म्हटलं, “देशाची प्रगती होत आहे, हे काहीजण स्वीकार करण्यास तयार नाहीत.”
-
“भारत अक्षय उर्जेत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. तर, मोबाईल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा जगभरात सर्वंत्र डंका वाजत आहे.”
-
“देशात सगळीकडे आशेचं वातावरण असताना काहींना ते दिसत नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
-
“२००४ ते २०१४ हे सर्वाधिक घोटाळ्याचं दशक ठरलं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशात सगळीकडे दहशतवादी हल्ले होत होते. जागतिक पातळीवर देशाची आवाज कमजोर होता, की कोणी ऐकण्यास तयारही नव्हतं.”
-
“२जी आणि कोळसा घोटाळ्यामुळे देशाची जगात बदनामी झाली. २००४ ते २०१४ दशकात देशाचं खूप नुकसान झालं. पण, २०३० हे दशक भारताचं आहे.”
-
“विरोधकांनी ९ वर्षे फक्त आरोप करण्यात घावली. निवडणूक हरली की ईव्हीएमला दोष दिला जातो. भ्रष्टाचाराची चौकशी झाली, तर तपास यंत्रणांना शिव्या दिल्या जातात. विरोधकांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल ईडीचे या लोकांनी आभार मानले पाहिजेत,” असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे.
Photos : राहुल गांधींचा समाचार ते ईडी तपासावरून विरोधकांना टोले; पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणाचे १२ मुद्दे
“काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशात सगळीकडे दहशतवादी…”
Web Title: Pm narendra modi on rahul gandhi and ed opposition party in loksabha ssa