-
शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण, शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. या विठ्ठलाला बडव्यांना घेरलं आहे. या बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडं परत येऊ, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं.
-
याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलत होते.
-
जयंत पाटील म्हणाले, “आमच्याबरोबर अनेक लोक होती. शरद पवारांनी अनेकांना मोठ्या संधी दिल्या. पण, आता विठ्ठलाच्या भोवती बडवे होते, असं सांगितलं जात आहे. छगन भुजबळ दोन वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले होते.”
-
“त्यावेळी शरद पवारांनी पुण्यात छगन भुजबळांच्या डोक्यावर महात्मा फुलेंच्या विचारांची पगडी ठेवली होती. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत.”
-
“ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची चेष्टा केली, त्यांच्या मांडीला-मांडी लावून बसला. २०१९ साली उद्धव ठाकरे सरकारचा शिवतीर्थावर शपथविधी होणार होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी मंत्रीपदाच्या शपथेसाठी दोन जणांची नावे देण्यास मला सांगितलं होतं.”
-
“शरद पवारांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं घेतलं. त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत. बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत. पण, मला वाद घालयाचा नाही,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.
PHOTOS : “शरद पवारांनी मंत्री केलं, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत”, जयंत पाटलांचा छगन भुजबळांना सवाल
“शरद पवारांनी अनेकांना मोठ्या संधी दिल्या. पण…”, असेही जयंत पाटील म्हणाले.
Web Title: Jayant patil reply chhagan bhujbal over sharad pawar ssa