-
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकाविरोधात जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे.
-
या बैठकीचं यजमानपद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे दिलं आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडी करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक वरळीत नेहरू सेंटर येथे पार पडली.
-
या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. “‘इंडिया’ आघाडीची आगामी म्हणजेच तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पार पडेल. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करत आहे,” असं नाना पटोले म्हणाले.
-
“महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी पाच नेत्यांकडे बैठकीचं नियोजन दिलं आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यामध्ये असतील.”
-
“आमच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. हे दोन नेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.
-
“राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला येणार आहेत,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमच्याबरोबर, ‘इंडिया’च्या बैठकीला राहुल गांधी येणार”
“महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी…”, असेही नाना पटोलेंनी सांगितलं.
Web Title: Sharad pawar and uddhav thackeray together with congress rahul gandhi coming mumbai india meeting say nana patole ssa