• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharad pawar jalna lathicharge and question narendra modi in jalgaon ssa

“आई-बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा…”, शरद पवारांनी जळगावमध्ये व्यक्त केला निर्धार

“फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं?” असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे.

September 5, 2023 20:03 IST
Follow Us
  • sharad pawar
    1/6

    जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी स्पष्ट करावं, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.

  • 2/6

    “आपल्याला आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करावा लागेल,” असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केली. ते जळगावमध्ये ‘स्वाभिमान’ सभेत बोलत होते.

  • 3/6

    शरद पवार म्हणाले, “देशात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. गेली काही वर्ष ईडी-सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्यातूनच नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकलं गेलं.”

  • 4/6

    “फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. फोडाफोडी करणाऱ्यांना संधी मिळताच योग्य उत्तर द्यावं लागेल,” असं इशारा शरद पवारांनी दिला.

  • 5/6

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट असल्याचे आरोप केले. मला त्यांनी विनंती करायची आहे की, देशातील सत्ता तुमच्या हातात आहे, राज्यातही तुमची सत्ता आहे. जर आमच्यापैकी कुणी चुकीचं काम केलं असेल तर खटला भरा, चौकशी करा आणि आरोप खोटे असतील, तर त्याची सजा तुम्ही काय घेणार ते आम्हाला सांगा”, असं आव्हानही शरद पवारांनी दिलं.

  • 6/6

    “शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची धग खान्देशातही जाणवते आहे. धरणात पाणी कमी आहे. पण, दुष्काळाबाबत राज्य शासन गंभीर नाहीये”, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

TOPICS
जळगावJalgaonजालनाJalnaपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठा आरक्षणMaratha Reservationशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar jalna lathicharge and question narendra modi in jalgaon ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.